जाहिरात

Success Story: 3 लाख रुपये किलोचे 'रेड गोल्ड'! जगातील सर्वात महागडा आंबा, शेतकऱ्याने करून दाखवली अशक्य गोष्ट

Most Expensive Mango In The World: मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने जगातील सर्वात महागडा जपानी 'मियाजाकी' आंबा पिकवण्याची किमया केली आहे. जाणून घेऊया शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी...

Success Story: 3 लाख रुपये किलोचे 'रेड गोल्ड'! जगातील सर्वात महागडा आंबा, शेतकऱ्याने करून दाखवली अशक्य गोष्ट
"Most Expensive Mango In The World: जगातील सर्वात महागडा आंबा"
NDTV

Most Expensive Mango In The World: आंतरराष्ट्रीय बाजारात 3 लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत विकल्या जाणाऱ्या जगातील सर्वात महागड्या 'मियाजाकी' या जपानी आंब्याची शेती मध्य प्रदेशात यशस्वी झाली आहे. सिवनी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ही किमया करून दाखवली आहे, सध्या सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा या 'रेड गोल्ड' म्हणजेच मियाजाकी आंब्याची पहिली फळे पिकली तेव्हा शेतकऱ्याने ती विकण्याऐवजी एका खास ठिकाणी नेऊन अर्पण केली. मियाजाकी आंब्याला जगातील सर्वात दुर्मीळ आंबा का म्हटले जाते आणि मध्य प्रदेशात तो पिकवण्यामागील संपूर्ण कहाणी काय आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

सिवनीच्या भूमीवर मियाजाकी आंबा पिकवण्याची किमया करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव धनसिंह राहंगडाले आहे. धनसिंह बरघाट विकासखंडातील पौनारकला गावात राहतात. त्यांच्या बागेत जगातील सर्वात महागडा जपानी मियाजाकी आंबा पिकवला जातोय. 

(नक्की वाचा: महागड्या AC पेक्षाही भारी! ऐतिहासिक किल्ल्यातील 'या' खोलीत नेमकी काय आहे जादू? जाणून घ्या सविस्तर)

2 वर्षांपूर्वी कोलकात्यावरून मागवले होते रोप

NDTV शी बोलताना शेतकरी धनसिंग राहंगडाले यांनी सांगितले की, सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर कोलकात्यावरून मियाजाकी आंब्याचे रोप मागवले होते. जे त्यांनी आपल्या बागेत लावले आणि त्याची काळजी घेतली. काळानुसार रोप चांगले वाढत गेले आणि आता या झाडावर फळ देखील येऊ लागली आहेत.

क‍िसान ने आष्टा के काली मंदिर में चढ़ाए मियाजाकी आम के पहले फल.

शेतकऱ्याने आष्टा येथील काली मंदिरात मियाजाकी आंब्याची पहिली फळे अर्पण केली..

आष्टा येथील ऐतिहासिक काली मंदिरात आंबे अर्पण केले

झाडाला आलेली आतापर्यंतची दोन फळं शेतकरी धनसिंह यांनी आष्टा येथील ऐतिहासिक काली मंदिरात अर्पण केली. माझ्या बागेतील कोणत्याही झाडाला पहिल्यांदा फळ लागते, तेव्हा आम्ही सर्वात आधी माता कालीलाच त्याचा नैवेद्य अर्पण करतो, असे धनसिंह यांनी सांगितले.

(नक्की वाचा: महिन्याला 1 लाख रुपये कमावणाऱ्यांनाही शहरात मिळेना घर! रिअल इस्टेट मार्केटमधील नव्या ट्रेंडने वाढवली चिंता)

शेतकऱ्याने फुलवली 2 एकरात आंब्याची बाग

धनसिंग राहंगडाले यांनी सांगितले की, दोन एकराच्या बागेत आंब्यांची 110 देशी जातीची झाडे आहेत, तर मियाजाकीसह 15 हून अधिक परदेशी जातींचे आंबे आहेत. मियाजाकी आंबा खरेदी करणारे ग्राहक मिळाले तर ते ग्राफ्टिंगच्या (कलम करण्याच्या) माध्यमातून या रोपांची संख्या आणखी वाढवतील.

बगीचे में क‍िंग ऑफ चकपात आम का पेड़ भी लगा.

बागेत 'किंग ऑफ चकपात' आंब्याचे झाडही लावले आहे.

भारतात मियाजाकी आंब्याची किंमत किती आहे?

गडद लाल रंगाचा मियाजाकी आंबा गोडवा, सुगंध आणि पोषक तत्त्वांमुळे जगातील सर्वात खास जातींपैकी एक मानला जातो. याचे नाव जपानमधील मियाजाकी शहराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्याच्या गडद लाल रंगामुळे आणि किमतीमुळे याला 'रेड गोल्ड' असेही म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात मियाजाकी आंब्याची किंमत 2 लाख रुपये ते 3 लाख रुपये प्रतिकिलो असते तर भारतात तो 5 हजार ते 15 हजार रुपये प्रतिकिलो या दराने विकला जातो.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com