1 तारखेला बँक खाते पुन्हा शून्य; 2 लाख पगार असूनही 'या' चुकीमुळे 20 लाखांच्या कर्जात अडकला तरुण!

Viral News: राजेशच्या या आर्थिक तंगीची सुरुवात बाय नाऊ, पे लेटर (BNPL) आणि सोप्या ईएमआयच्या (Easy EMI) जाहिरातींमुळे झाली.

जाहिरात
Read Time: 4 mins
दरमहा 2 लाख रुपये कमावणारा तरुण 20 लाखांच्या कर्जात कसा अडकला?
मुंबई:

Viral News: पॉश कॉरपोरेट ऑफिस, वीकेंड पार्ट्या आणि हातात लेटेस्ट आयफोन... आजच्या तरुण आयटी प्रोफेशनल्सचे हे लाईफस्टाईल पाहून अनेकदा वाटतं की ते किती आलिशान आयुष्य जगत आहेत. पण या झगमगाटामागे एक अशी कटू सत्य दडलं आहे, ते हळूहळू देशाच्या तरुणाईला आपल्या विळख्यात घेत आहे. ही गोष्ट आहे दिल्ली-NCR मध्ये काम करणाऱ्या 27 वर्षांच्या राजेश (नाव बदलले आहे). तो दरमहा 2 लाख रुपये कमावतो, पण महिन्याची शेवटची तारीख येईपर्यंत त्याचा बँक बॅलन्स शून्य होतो. एवढेच नाही तर सध्या त्याच्यावर 20 लाख रुपयांचे प्रचंड कर्ज आहे.

नेमकं काय होतं?

आजपासून 5 वर्षांपूर्वी  राजेशनं सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, तेव्हा त्याचा पगार 40 हजार रुपये होता. सततची मेहनत आणि 2 वेळा नोकरी बदलल्यानंतर आज त्याचा इन-हँड पगार 2 लाख रुपये महिना आहे. एवढी मोठी रक्कम कोणत्याही 27 वर्षांच्या तरुणासाठी एक मजबूत आर्थिक आधार ठरू शकते, पण राजेशच्या बाबतीत संपूर्ण गणितच उलटे झाले.

Advertisement

रेडिटवर एका पोस्टद्वारे आपली व्यथा मांडताना राजेश सांगतो,  तुमचा पगार वाढतो, तेव्हा तुमच्यासोबत उठबस करणाऱ्या लोकांचे सर्कलही बदलतो. मित्रांना पाहून मी आधी क्रेडिट कार्ड घेतले, मग विचार न करता एक लक्झरी कार लोनवर घेतली. मला वाटले की 2 लाख रुपये महिना येतच आहेत, EMI सहज निघून जाईल.

( नक्की वाचा : SMS Fraud: मेसेज उघडताच बँक खाते रिकामे! ऑनलाईन फसवणुकीचा नवा प्रकार,'या'युजर्सना सर्वाधिक धोका )

20 लाख रुपयांचे कर्ज कसे झाले?

राजेशच्या या आर्थिक तंगीची सुरुवात बाय नाऊ, पे लेटर (BNPL) आणि सोप्या ईएमआयच्या (Easy EMI) जाहिरातींमुळे झाली. त्याच्या खर्चाचे आणि कर्जाचे गणित समजून घेतले तर चित्र काहीसे असे दिसते:

  • ऑफिसजवळ एका प्राईम लोकेशनवर 2BHK फ्लॅट, ज्याचे एका महिन्याचे भाडे 45 हजार रुपये आहे.
  • मित्रांमध्ये स्टेटस सिम्बॉल ठेवण्यासाठी खरेदी केलेली SUV कार, ज्यामुळे दरमहा 35 हजार रुपयांची EMI कट होते. या कार लोनची एकूण थकबाकी अजून 12 लाख रुपये आहे.
  • महागडे गॅझेट्स, व्हेकेशन ट्रिप्स आणि ब्रँडेड कपड्यांच्या शौकामुळे 3 वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड्सवर जवळपास 5 लाख रुपयांचे  बिल थकित आहे. याचे मासिक हप्ते आणि व्याज मिळून सुमारे 40 हजार रुपये दरमहा जातात.
  • क्रेडिट कार्डचे जुने बिल भरण्यासाठी आणि होम टाऊनमध्ये दाखवण्यासाठी केलेल्या खर्चाच्या नादात घेतलेले 3 लाख रुपयांचे पर्सनल लोन, ज्याची EMI 18 हजार रुपये आहे.

या सर्व फिक्स्ड खर्चानंतर राजेशकडे रोजचे खर्च, पेट्रोल, युटिलिटी बिल्स आणि वीकेंड पार्ट्यांसाठी अगदीच नाममात्र पैसे उरतात. परिणामी महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांत खर्च भागवण्यासाठी त्याला पुन्हा क्रेडिट कार्डचा आश्रय घ्यावा लागतो.

( नक्की वाचा : DMart News: झेप्टो-ब्लिंकिटमुळे डी मार्टला फटका? दमानींनी शोधला नवा तोडगा, ग्राहकांना मिळणार मोठी लॉटरी )

पगार येताच बँक अकाऊंट रिकामे

राजेशच्या मोबाईलवर दरमहा 30 तारखेला 'Salary Credited: INR 2,00,000' असा मेसेज येतो, पण पुढील 2 दिवसांच्या आत ऑटो-डेबिटद्वारे ती सर्व रक्कम वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात जमा होते. राजेशनं याबाबत पुढे सांगितलं की, 1 तारखेला माझा बँक बॅलन्स पुन्हा झिरो होतो. मानसिक ताण एवढा वाढला आहे की आता कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होत आहे. मला सतत भीती वाटते की जर काही कारणास्तव नोकरी गेली, तर मी या बँकांचे कर्ज कसे फेडणार?

Advertisement
Earning ₹2L/month but drowning in debt, need advice
by u/lonewolf_2298 in FinancialAdviceIndia

या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग काय?

फायनान्शियल एक्सपर्ट्सच्या मते, राहुलसारखी परिस्थिती आज देशातील हजारो तरुणांची आहे. याला लाईफस्टाईल इन्फ्लेशन (Lifestyle Inflation) आणि EMI ट्रॅप म्हटले जाते. यातून बाहेर पडण्यासाठी एक्सपर्ट्स 3 मुख्य पावले उचलण्याचा सल्ला देतात:

  • सर्वात आधी ज्या कर्जावर सर्वाधिक व्याज आहे ते संपवा, जसे की क्रेडिट कार्डचे लोन, जिथे 36% ते 42% पर्यंत वार्षिक व्याज असते. पर्सनल लोन किंवा इतर माध्यमातून क्रेडिट कार्डचे पूर्ण बिल एकदाच भरून कार्ड्स ब्लॉक करून टाकले पाहिजेत.
  • कारचे EMI बजेटच्या बाहेर जात असेल, तर कार विकून लोनचा एक मोठा हिस्सा फेडणे आणि काही काळासाठी सार्वजनिक वाहतूक किंवा कॅबचा वापर करणे हाच समजूतदारपणा आहे.
  • तुमच्या एकूण कमाईचा 50% हिस्सा अनिवार्य गरजांवर (भाडे, अन्न), 30% हिस्सा इच्छांवर (एन्टरटेनमेंट, फिरणे) आणि किमान 20% हिस्सा भविष्यातील बचत किंवा गुंतवणुकीत गेला पाहिजे.

( स्पष्टीकरण: ही बातमी रेडिटवर व्हायरल झालेल्या एका पोस्टवर आणि त्यावर आलेल्या सार्वजनिक प्रतिक्रियांवर आधारित आहे. NDTV मराठी'नं या पोस्टमध्ये संबंधित व्यक्तींनी केलेल्या दाव्यांची स्वतंत्रपणे शहानिशा केलेली नाही.)
 


Topics mentioned in this article