Palghar Crime News : पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील वनवासी कल्याण केंद्राच्या निवासी वस्तीगृहातील 12 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. शाळेत नेमलेल्या एका अधीक्षकाने आणि मॉनिटरने या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. विद्यार्थ्यांनी शौचलयाची साफसफाई नीट केली नव्हती.त्यामुळे विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पायावर व्रण उठल्याने ते जखमी झाले. विद्यार्थ्यांना चालण्याचा त्रास होऊ लागल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, तलासरी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे.
पालघरच्या त्या आश्रमशाळेत नेमकं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना मारहाण करणारा विद्यार्थी हा याच निवासी वसतीगृहाचा माजी विद्यार्थी आहे. तो सध्या तलासरी येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता.याप्रकरणी तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली असून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळेतील मॉनिटरकडे वसतीगृहातील विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याची जबाबदारी असते. पण अधीक्षकांनीच विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यामुळे पालकांनी आणि सामाजिक संघटनांकडून संबंधीत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नक्की वाचा >> ग्राहकांनो! आता काय खरं नाय..सोनं तर सोडाच..चांदीचे भावही गगनाला भिडले, आजचे GOLD-SILVER रेट वाचून डोकंच धराल!
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातही भयंकर घटना घडली. येथील आंबिस्ते आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी,शिक्षकवर्ग आणि पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.देविदास नावले (इयत्ता 10 वी), मनोज वड (इयत्ता 9 वी) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी मोखाडी तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आलीय. रात्री एक वाजताच्या सुमारास या विद्यार्थ्यांनी दोरीच्या साहय्याने आश्रमशाळेच्या परिसरातील एका झाडाला गळफास लावून जीवन संपवलं. मागील आठवड्यात आदिवासी मुलींच्या विक्रीचे आणि जबरदस्तीने लग्न लावल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ माजली होती.
नक्की वाचा >> INDW vs SAW : स्मृती मंधानाचा धमाका! ODI क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 27 वर्षांपूर्वीचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला