जाहिरात

INDW vs SAW : स्मृती मंधानाचा धमाका! ODI क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 27 वर्षांपूर्वीचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

Smriti Mandhana ODI Record IND vs SAW WC : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधानाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे.

INDW vs SAW :  स्मृती मंधानाचा धमाका!  ODI क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 27 वर्षांपूर्वीचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला
Smriti Mandhana ODI Record
मुंबई:

Smriti Mandhana ODI Record IND vs SAW WC : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधानाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे. आज शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाविरोधात विशाखापट्टनम येथे सामना रंगला. या सामन्यात मंधानाने एक कॅलेंडर वर्षात वनडेत सर्वात जास्त रन्स केले आहेत. मंधाना अशी कामगिरी करणारी पहिली फलंदाज बनली आहे. मंधानाने 26 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात मंधानाने 33 चेंडूत 23 धावा केल्या. मंधाना 11 धावांवर असताना एल कॅलेंडर वर्षात वनडेत सर्वाधिक रन्स करणारी पहिली फलंदाज बनली. मंधानाने यावर्षी 17 वनडे सामन्यांच्या 17 इनिंगमध्ये 4 शतक आणि 3 अर्धशतकी खेळी करून 982 धावा केल्या.

मंधानाला आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी

यापूर्वीचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या ब्लेंडा क्लार्कच्या नावावर होता. क्लार्कने 1997 मध्ये 970 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्डट 2022 मध्ये 882 धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे. मंधानाकडे एक कॅलेंडर वर्षात 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची संधी आहे. हा कारनामा ती याच वर्ल्डकपमध्ये करू शकते. 

नक्की वाचा >> ग्राहकांनो! आता काय खरं नाय..सोनं तर सोडाच..चांदीचे भावही गगनाला भिडले, आजचे GOLD-SILVER रेट वाचून डोकंच धराल!

मंधानाचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

स्मृती मंधानाचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या वनडे सीरिजमध्ये ती प्रचंड फॉर्ममध्ये होती आणि अनेक शतकी खेळी केल्या होत्या. पण वर्ल्डकप आधीही स्मृती मंधानाला धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. या सामन्यात ती जेव्हा 23 धावांवर खेळत होती, तेव्हा असं वाटत होतं की ती मोठी धावसंख्या गाठेल. पण तिचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तिच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली.

वर्ल्डकपच्या तीन सामन्यांमध्ये स्मृती मंधानाचा फॉर्म 

मंधाना वर्ल्डकपच्या तिन्ही सामन्यांमध्ये 8,23 आणि 23 धावाच करून बाद झाली. तिचा खराब फॉर्म भारतीय संघाच्या फलंदाजीला कमकुवत करत आहे.टूर्नामेंटमध्ये जर भारतीय संघाला चांगली कामगिरी करायची असेल, तर मंधानाला फॉर्मममध्ये येणं खूप गरजेचं आहे.

नक्की वाचा >> गोंडस बाळ आईची वाट पाहत होतं, ड्युटी करून आई घरी परतली अन् बाळानं असं काही केलं..Video पाहून डोळे पाणावतील!

एक कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त वनडे रन्स 

982* - स्मृती मंधाना  (भारत-विजयी,2025)
970 - बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया-विजेयी, 1997)
882 - लौरा वोल्वार्ड्ट (दक्षिण अफ्रिका-विजयी,2022)
880 - डेबी हॉकले (न्यूझीलंड-विजयी, 1997)
853 - एमी सॅटरथवेट (न्यूझीलंड -विजयी, 2016)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com