
मुंबई: राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून पोलीस प्रशासनामध्ये मोठे बदल केले जात आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, अत्याचाराच्या वाढत्या घटना तसेच आता पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराच्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता राज्याच्या पोलीस यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले असून 13 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. अशातच आता 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक (एसपी), उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये मनोज कुमाक शर्मासह यशस्वी यादव, आर. बी डहाळे यांचा समावेश आहे.
बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची यादी:
- यशस्वी यादव - अपर पोलीस महासंचालक, सायबर, महाराष्ट्र
- अशोक मोराळे - विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग
- निखिल गुप्ता - अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था)
- के. एम. मल्लिकार्जून प्रसन्ना - अपर पोलीस महासंचालक (प्रशासन)
- राजीव जैन - विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल
- मनोज कुमार शर्मा - विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था)
- आर. बी. डहाळे - विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र
- छेरिंग दोर्जे - अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान)
- अभिषेक त्रिमुखे - अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
- सुरेश मेखला - अपर पोलीस महासंचालक. आर्थिक गुन्हे
- अश्वती दोर्जे - अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग
- सुहास वारके - अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सेवासुधार
- श्रेणिक लोढा - अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world