जाहिरात

Liquor Shop Licenses: मद्यविक्री परवान्यांची खैरात! राज्यात 328 नव्या दुकानांची भर, अजित पवारांकडे सूत्रे

Maharashtra New Liquor Shop Permit: राज्यात 328 नवे मद्यविक्री परवाने दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे नवे परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार आहेत.

Liquor Shop Licenses: मद्यविक्री परवान्यांची खैरात! राज्यात 328 नव्या दुकानांची भर, अजित पवारांकडे सूत्रे

मुंबई: गेल्या 50 वर्षांपासून राज्यातील वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती आता उठण्याची शक्यता आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्याने 328 नवे मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. विदेशी मद्यनिर्मिती परवाना देण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच समिती नेमण्यात येणार आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात 328 नवे मद्यविक्री परवाने दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे नवे परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार आहेत. यामध्ये प्रत्येकी एका कंपनीला मद्यविक्रीचे 8 परवाने मिळणार आहेत. तसेच हे परवाने भाड्याने देण्याचीही मुभा असणार आहे. या विदेशी मद्यनिर्मिती परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार यांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे कॅपोव्हिटेज या मद्यनिर्मितीच्या कंपनीच्या संचालकपदी जय पवार आहेत, त्यामुळे हितसंबंधाचा धोका असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. 

Bar and Restaurant Strike : मद्यप्रेमींचे उद्या हाल; राज्यातील बार आणि रेस्टॉरंट बंद राहणार, कारण काय?

 हे राज्याच्या महसूल वाढीसाठी शासन 328 नवे मद्यविक्री परवाने देण्यात येणार आहेत. राज्यात जुना मद्यविक्री परवाना विकत घेण्यासाठी 10 कोटी मोजावे लागतात. मात्र आता नवीन परवाना घेण्यासाठी कंपन्यांना शासनाकडे फक्त 1 कोटी जमा करावे लागणार आहेत. तसेच मद्यविक्री कंपन्यांनी भरलेली 1 कोटींची रक्कम विनापरतावा असेल. मात्र अजित पवार  हे विदेशी मद्यनिर्मितीचे परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी असल्याने विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे.

याबाबत आता अजित पवार यांनीही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.  आपण एक नियम केला आहे की परवाने द्यायचे असतील तर विधिमंडळाला विश्वासात  घेतल्याशिवाय देवू नका. दुसऱ्या राज्यात परवाने वाढत आहेत पण आपण नियमत राहून सगळं करतो. परंतु आपली पद्धत वेगळी आहे जर शॉप स्थलांतर करायचं असेल तर आपण नियमांनुसार परवानगी देतो,  पण सगळ नियमांत होते. महिलांनी मागणी केली तर आपण बंद करतो दुकाने असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

नक्की वाचा - Pune Crime News : गांजा तस्करी ते सव्वा कोटींची बनावट दारू जप्त; पुण्यातील संस्कृतीला हादरवणाऱ्या 2 घटनांनी चिंता वाढली

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com