धुळ्यात उन्हाचा तडाखा; दोंडाईचा परिसरात उष्माघातामुळे दोन दिवसात 4 बळी

वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा परिसरात दोन दिवसात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. तापमानाने 44 ते 45 अंशाचा आकडा पार केल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. प्रचंड उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा परिसरात दोन दिवसात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये रस्त्यावर भीक मागणारे व अन्य बेवारस व्यक्तींचा समावेश आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उष्माघातामुळे त्यांचा जीव गेला असावा, असा अंदाज पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करण्यासाठी सामाजिक संघटनांनी, संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

(नक्की वाचा- वाचा -  चहा पिण्याची तलफ अन् लाखोंचा गंडा; तात्यासाहेबांचं 'ते' स्वप्नही भंगलं! )

जळगावात 8 दिवसात 50 मृत्यू

जळगाव जिल्हा रूग्णालयात एक धक्कादाय प्रकार समोर आला आहे. गेल्या 8 दिवसात रूग्णालयात एक दोन नाही तर तब्बल 50 मृतदेह आले आहे. त्यातील 16 मृतदेह हे बेवारस असल्याचे स्पष्ट झाले आहेत. या भागात सध्या उकाडा वाढत आहे. त्यामुळे हे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.

(नक्की वाचा-  मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन)

जळगाव, अकोल्यात जमावबंदी लागू

जळगाव आणि अकोल्यात वाढत्या तापमानामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लागू केले आहे. सकाळी 11.30 ते सायंकाळी 4.30 या कालावधीत बाहेर जाणे नागरिकांनी टाळावे, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. वाढत्या तापमानामुळे कामगारांना काम करणे बंधनकारक करता येणार नाही. अत्यावश्यक सेवांमध्ये कामाच्या ठिकाणी पाण्याची सोय, पंखे, कुलर यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.  कोचिंग क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांसाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेशही प्रशानसाने दिले आहेत. 

Advertisement
Topics mentioned in this article