धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून स्वतंत्र आरक्षण द्या; बीडमध्ये तरुणांचं शोले स्टाईल आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमधील खिल्लारे परिवाराचे धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी उपोषण करणाऱ्या तरुणांनी केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी केज तालुक्यातील केकतसारणी येथील चार युवक गावातील पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसले आहेत. अनंत धायगुडे, संदीपान धायगुडे, अंकुश मन्नाडे, महादेव नरवटे अशी धनगर समाजासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांनी नावे आहेत. या तरुणांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने उपोषण सुरू केले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सरकार जोपर्यंत धनगर समाजातील नेत्यांशी चर्चा करून एसटी प्रवर्गात समावेश होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील खिल्लारे परिवाराचे धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी उपोषण करणाऱ्या तरुणांनी केली आहे.

(नक्की वाचा- हृदयद्रावक! लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला निघालेल्या महिलेचा वाटेतच मृत्यू)

दरम्यान आज या उपोषणाला आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार सचिन देशपांडे विविध लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या आहेत.

एकाचा टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न 

अजय शिंदे हा तरुण उपोषणाला बसलेल्या तरुणांना भेटायला गेला होता. त्यावेळी त्याने टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावकऱ्यांनी समजूत काढून त्याल्या खाली उतरवलं. त्यानंतर अजय शिंदे याने घरी येऊन कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

Advertisement

(नक्की वाचा- रुग्णांच्या रिपोर्ट्सच्या बनवल्या पेपर प्लेट्स; KEM रुग्णालयातील संतापजनक प्रकार)

मात्र मित्रांच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचू शकले. सध्या त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

Topics mentioned in this article