जाहिरात

हृदयद्रावक! लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला निघालेल्या महिलेचा वाटेतच मृत्यू 

Nashik Accident News : उज्वला चौधरी असं मृत महिलेचं नाव आहे. उज्वला या लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी निघाल्या होत्या.

हृदयद्रावक! लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला निघालेल्या महिलेचा वाटेतच मृत्यू 

निलेश वाघ, मनमाड

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांची लगबग सुरु झाली आहे. कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यासाठी महिला धावपळ करत आहे. अशीच लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात निघालेल्या महिलेचा वाटेतच अपघाती मृत्यू झाला आहे. ट्रकच्या धडकेत या महिलेचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या येवल्यात ही घटना घडली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उज्वला चौधरी असं मृत महिलेचं नाव आहे. उज्वला या येवला रेल्वे स्टेशन परिसरात राहत होत्या. उज्वला या लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी निघाल्या होत्या. मात्र वाटेतच त्यांना नगर -मनमाड महामार्गावर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच अज्ञात वाहनाने धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा जागीच मृत्य झाला.

(नक्की वाचा- लय भारी!'लाडकी बहीण योजना' सातारा पॅटर्नची राज्यात चर्चा का?)

दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहे.

(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेच्या अटीमध्ये महत्त्वाचे बदल, अर्ज भरण्यापूर्वी वाचा सर्व माहिती)

राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार राज्यातील 21 ते 65 वर्षांच्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये महिलांना दरमाह 1500 रुपयांचा निधी मिळणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
सिडकोच्या रेल्वे स्थानकाबाहेरील घरांची सोडत पुढे का ढकलली? कारण आले समोर
हृदयद्रावक! लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला निघालेल्या महिलेचा वाटेतच मृत्यू 
bus-truck accident on Pune-Solapur highway bus fell into 25 feet deep
Next Article
पुणे-सोलापूर महामार्गावर बस-ट्रकचा विचित्र अपघात, बस 25 फूट खोल खड्यात घसरली