जाहिरात

Fake Certificate: पूजा खेडकर पॅटर्न! सांगली उपायुक्तांनीही MPSCला गंडवलं? कर्णबधीर प्रमाणपत्र खोटं

ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत, असंही ते म्हणालेत.

Fake Certificate: पूजा खेडकर पॅटर्न! सांगली उपायुक्तांनीही MPSCला गंडवलं? कर्णबधीर प्रमाणपत्र खोटं

Vaibhav Sable Fake Certificate Case: सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. महापालिका क्षेत्रातल्या एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी वैभव साबळे यांनी ही लाच मागितली होती. याप्रकरणी वैभव साबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असतानाच आता वैभव साबळे यांचा नवा कारनामा समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा आप नेते विजय कुंभार यांनी एमपीएससी परीक्षा “कर्णबधीर” असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणालेत विजय कुंभार?

24 मजली इमारतीच्या परवान्यासाठी 7 लाखांची लाच मागणारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा उपायुक्त वैभव विजय साबळे अखेर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे.  हा तोच वैभव साबळे आहे, ज्याने एमपीएससी परीक्षा “कर्णबधीर” असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केली होती, असा गंभीर आरोप विजय कुंंभार यांनी केला आहे.

गंमत म्हणजे, 1993 साली ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशीच त्याला कर्णबधीर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं! हे सगळं माहित असूनही यंत्रणेकडून काहीतरी कारवाई झाली का? नाही! पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतरच साबळेने शोभेच्या श्रवण यंत्राचा वापर सुरू केला. त्याआधी तो कधीही ते वापरत नव्हता. लोकांच्या तक्रारींच्या ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत, असंही ते म्हणालेत.

नक्की वाचा : 'टाईम प्लीज' घेतलेला पाऊस पु्न्हा परतणार; येत्या 2-3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

आज ही गोष्ट पुन्हा सिद्ध झालीय. फसवून, खोटं बोलून, प्रमाणपत्र बनवून सेवेत आलेले लोक प्रामाणिक काम करू शकत नाहीत. ते फक्त खुर्चीचा गैरवापर करून, सामान्य जनतेचा छळ करून आणि लाच घेऊन आपल्या बोगस पात्रतेला लपवण्याचं काम करतात. सरळ शब्दांत सांगायचं झालं तर सिस्टम आतून सडलीय आणि ही सडलेली सिस्टमच आज कर्णबधीर नाही, तर संपूर्णतः मूक आणि अंध झालीय.. अशा शब्दात विजय कुंभार यांनी संताप व्यक्त केला आहे. 

नक्की वाचा : गुगल मॅपमुळे कार हवेत लटकली; प्रवासी थोडक्यात बचावले

Listen to the latest songs, only on JioSaavn.com