Dhule News: कार दुरुस्त करण्यासाठी आला पण घरी परतलाच नाही; ट्रकच्या धडकेत मॅकेनिकचा मृत्यू

Dhule News: महामार्गावर एक कार नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीसाठी धुळ्याहून जुनैद याला बोलावण्यात आले होते. तो काम करत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, धुळे

मृत्यू कुणाला कधी आणि कसा गाठेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना धुळ्यातून समोर आली आहे. जिथे महामार्गावर बिघडलेली कार दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या मॅकेनिकचा ट्रकच्या धडकेत जागीत मृत्यू झाला आहे.

धुळे तालुक्यातील नगाव शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर ही भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रस्त्यावर बंद पडलेल्या कारला दुरुस्त करत असतानाच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. अपघातात जुनैद पठाण (वय 30) या तरुण मॅकेनिकलचा जागीच मृत्यू झाला आहे.

(नक्की वाचा- Latur News: भयंकर कांड! तरुणाला आधी पोत्यात भरलं, मग गाडीत टाकलं, कारला आग लावून जिवंत जाळलं)

धुळ्याहून आलेल्या जुनैदचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर एक कार नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीसाठी धुळ्याहून जुनैद याला बोलावण्यात आले होते. तो काम करत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला. या धडकेत कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.

टोल नाक्यावरील रुग्णवाहिका आणि पश्चिम देवपूर पोलिसांच्या मदतीने जुनेद पठाणला उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी धडक देणाऱ्या ट्रकला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article