Akole Constituency : वडील रुग्णालयात, मुलगा दु:खात; कार्यकर्त्यांनी एकत्र येत परस्पर दाखल केला उमेदवारी अर्ज

Maharashtra Election 2024 : अकोले विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अकोल्याचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड हे रुग्णालयात थांबून त्यांची काळजी घेत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, अकोले

भाजप नेते मधुकर पिचड रुग्णालयात असताना कार्यकर्त्यांकडून माजी आमदार वैभवराव पिचड यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वैभव पिचड यांच्या अनुपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात पिचडांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी आमदार वैभव यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अकोले विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अकोल्याचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड हे रुग्णालयात थांबून त्यांची काळजी घेत आहेत. दुसरीकडे महायुतीच्या वाटाघाटीत अकोलेची जागा अजित पवार गटाला सोडली गेली आणि पवारांनी विद्यमान आमदार किरण लहामटे यांची उमेदवारी ही घोषित केली. 

(ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?)

Madhukar Pichad

त्यामुळे पिचड समर्थक कार्यकर्त्यांनी वैभव पिचड यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा आग्रह धरला होता. मात्र वैभव पिचड निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत नव्हते. अखेर काल रात्रभर पिचडांची कार्यकर्त्यांनी मनधरणी करत त्यांची स्वाक्षरी घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

(ट्रेंडिंग बातमी -  सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीची पहिली यादी आली, कोणाला उमेदवारी कोणाला वगळलं?)

अकोले शहरात पिचड पिता-पुत्रांच्या अनुपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत वैभव पिचडांच्या वतीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीतीचे उमेदवार किरण लहामटे यांची डोकेदुखी वाढणार असल्याच दिसून येत आहे. दुसरीकडे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने अकोलेची उमेदवारी अद्याप घोषिक केलेली नसल्याने नाट्यमय घडामोडी घडतात का? याकडे अकोले मतदारसंघाच लक्ष लागलंय.