
मुंबई: बीकेसी, बांद्रा पूर्व, बांद्रा पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रुज पूर्व आणि त्या परिसरातील निवासी, व्यापारी विभागाच्या वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने बांद्रा-कुर्ला व्यापारी संकुलात ( बीकेसी ) २२० केव्हीच्या अत्याधुनिक डिजिटल सबस्टेशनचे उद्घाटन केले आहे. या महत्त्वाच्या पायाभूत सुविधेत वाढ केल्यामुळे मुंबईतील ऊर्जा वितरण जाळे आणखीन सक्षम होणार असून त्याद्वारे सध्याच्या गरजा आणि भविष्यातील विकासासाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम अशा वीज पुरवठ्याची खात्री मिळेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आधुनिक तंत्रज्ञान आणि वाढीव कार्यक्षमता
हे अत्याधुनिक सबस्टेशन आयसीई - 61850 प्रोसेस बस टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर करते. त्यामुळे तेथील तांब्याच्या तारांचा वापर 92 टक्के कमी झाला आहे आणि त्याचमुळे तेथून होणारी पर्यावरणाची हानी देखील 50 टक्के कमी झाली आहे. या सबस्टेशन मध्ये पर्यावरणपूरक 220 केव्ही 2 X 125 एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मर असून त्यामुळे त्याची अग्नीसुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढली आहेच, पण उच्च दर्जाची कामगिरी आणि ही व्यवस्था दीर्घकाळ टिकेल याची खात्रीही झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट ग्रीड क्षमतेमुळे हे सबस्टेशन वीज वितरणातील हानी कमी करेल आणि एकंदर ग्रीड चे स्थैर्य देखील राखेल.
मुंबईच्या भविष्यातील अखंड आणि मुबलक वीज पुरवठ्याची खात्री
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नुकतेच अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या आरे आणि बीकेसी सबस्टेशन दरम्यानच्या २२० केव्ही च्या जोडणीला मान्यता दिल्याने विश्वासार्ह वीज पुरवठ्याची ग्वाही मिळाली आहे. बीकेसी मधील या दुसऱ्या व्यवस्थेमुळे परिसरातील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढणार असून त्यामुळे मुंबईच्या प्रमुख व्यापार केंद्रातील विश्वासार्ह आणि पसंतीप्राप्त वीज पुरवठादार हे अदाणी इलेक्ट्रिसिटी चे स्थान आणखी पक्के होईल.
हे २२० केव्ही सबस्टेशन सुरू होणे हे मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगाने वाढणाऱ्या व्यापार केंद्रात विश्वासार्ह आणि अखंड वीज पुरवठा मिळण्यातील महत्त्वाचे पाऊल आहे. मुंबईतील निवासी आणि व्यापार क्षेत्र तसेच पायाभूत सुविधा वाढत असल्याने विजेची मागणीही सतत वाढतीच असताना आम्ही मुंबईला विश्वासार्ह, उच्च दर्जाचा आणि पर्यावरणपूरक वीजपुरवठा देण्यास बांधील आहोत. ज्यायोगे मुंबईच्या सातत्यपूर्ण विकासाची खात्री मिळेल, असे अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या प्रवक्त्याने सांगितले.
( नक्की वाचा : पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! 227 प्रवाशांचा जीव होता धोक्यात तरीही नाकारली लँडिंगची परवानगी )
पर्यावरणपूरक आणि सातत्यपूर्ण विकासासाठी कटिबद्ध
मुंबईतील व्यापारी आणि निवासी विभागांना सातत्यपूर्ण आणि स्थिर तसेच पर्यावरणपूरक वीजपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ऊर्जा जाळ्याचे सक्षमीकरण करण्यास अदाणी इलेक्ट्रिसिटी बांधील आहे आणि त्याच ध्येयाशी या सबस्टेशनची उभारणी सुसंगत आहे. या सबस्टेशन मधून बीकेसी आणि परिसरातील व्यापारी, निवासी संकुलांना तसेच अन्य पायाभूत सुविधांना वीजपुरवठा केला जाईल. त्यायोगे मुंबईच्या आर्थिक आणि शहरी विकासाला बळ देण्याच्या अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या ध्येयाला हातभार लागेल. पर्यावरणपूरक आणि हरित अशा भविष्याचे अदाणी इलेक्ट्रिसिटी चे लक्ष्य असून या प्रकल्पात देखील ऊर्जा सक्षम आणि पर्यावरण पूरक कामकाज समाविष्ट आहे.
'काही करण्यापूर्वीच ब्रह्मोसनं...' पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली भारतीय हल्ल्याची मोठी कबुली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world