जाहिरात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर पक्षाची सर्वात मोठी जबाबदारी; आमदारांकडून उत्स्फूर्त पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर पक्षाची सर्वात मोठी जबाबदारी; आमदारांकडून उत्स्फूर्त पाठिंबा

Sunetra Pawar National President : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी एका महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. या घोषणेनंतर उपस्थित सर्व आमदारांनी हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याचं समजते.

आजची साप्ताहिक बैठक सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. अजित पवार ज्या पद्धतीने पक्षाचे आणि प्रशासकीय कामांचे नियोजन करायचे, अगदी त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार यांनी या बैठकीचे कामकाज हाताळले. विशेष म्हणजे, गेल्या २-३ दिवसांत त्यांनी मंत्रालयातील विविध बैठका घेऊन आपल्या कामाची चुणूकही दाखवून दिल्याचं म्हटलं जात आहे.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

यावेळी बारामती आणि मंत्रालयाशी संबंधित कामांचा आढावा सुनेत्रा पवार यांनी घेतला. आगामी निवडणुका आणि अर्थसंकल्पातील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. २३ फेब्रुवारीला शोकसभा आयोजित करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारीला मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार असून, याच दिवशी अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे. पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी तारखाही निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.

नक्की वाचा - Ajit Pawar Plane Crash :ब्लॅक बॉक्समधून डेटा रिकव्हर करण्यात अडचण? दादांच्या अपघाताचं खरं कारण..
  
सध्याच्या घडीला इतर कोणत्याही पक्षात विलीनीकरण करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच झिरवळ प्रकरणावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले. अजित पवार यांच्या संदर्भातील तपास अहवालावरही बैठकीत चर्चा झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नायडू आणि मोहोळ उपस्थित होते. भारत सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक स्वायत्त संस्था स्थापन केली आहे. देशातील आणि परदेशातील तपास यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून या प्रकरणातील सत्य बाहेर येणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. रोहित पवार यांनी केलेल्या विधानावर भाष्य करताना सांगण्यात आले की, त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे, मात्र अशा घटनांमध्ये स्वायत्त यंत्रणांचा तपास अहवाल येणे महत्त्वाचे असते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com