जाहिरात

Ajit Pawar Plane Crash :ब्लॅक बॉक्समधून डेटा रिकव्हर करण्यात अडचण? दादांच्या अपघाताचं खरं कारण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला १९ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही विमानाच्या कंपनीकडून मागितलेली माहिती देण्यात आलेली नाही.

Ajit Pawar Plane Crash :ब्लॅक बॉक्समधून डेटा रिकव्हर करण्यात अडचण? दादांच्या अपघाताचं खरं कारण...

Ajit Pawar plane crash black box : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला १९ दिवस पूर्ण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले होते. अजित पवार यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय रोहित पवारांनी केला होता. याशिवाय आमदार अमोल मिटकरीही वारंवार या प्रकरणात सवाल उपस्थित करीत आहेत आणि अजित दादांच्या अपघाताची योग्य ती तपासणी करावी अशी मागणी करीत आहेत. दरम्यान अमोल मिटकरी यांनी एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. 

कोणत्याही विमान अपघातानंतर त्याचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला जातो. यामुळे अपघात कसा घडला, त्यावेळी विमानात काय परिस्थिती होती याची माहिती कळते. यामुळे पुढील तपासाचा मार्ग निश्चित करता येतो. दरम्यान या ब्लॅक बॉक्सबाबत अमोल मिटकरींनी मोठी माहिती दिली आहे.  

अमोल मिटकरींची मोठी मागणी...

अमोल मिटकरी यांनी ब्लॅक बॉक्स संदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिलंय, ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण होत आहे. आता ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होणार व “लवकरच” विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजते. आम्ही वाट पाहू, पण तोपर्यंत विमानतळावरील CCTV फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या  गाडीतून निघाले, कोणत्या रोडवरील ट्रॅफिकमध्ये अडकले, त्या ठिकाणचे cctv फुटेज व सर्व या पायलटचा २८ जानेवारी २०२६ चा दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com