
राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Farmers Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना (Farmer News) दोन वेळा कर्जमाफी देण्यात आली होती. 2009 आणि 2022 मध्ये. 2009 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दीड लाख कोटींची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. मात्र कर्ज माफीनंतरही देशातील महाराष्ट्राचे शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी असल्याची माहिती आहे. संसदेतून कर्जबाजारी राज्याचे नवे आकडे (Farmers of Maharashtra are the most indebted) समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याचं दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत असून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल 33 लाख 50 हजार कोटींचे थकीत कर्ज आहे. त्यापैकी सर्वाधिक थकबाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 7 लाख 38८ हजार कोटींचे कर्ज थकलेले आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिली. संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाणिज्य मंत्र्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात सर्वाधिक 7.38 लाख कोटी रुपयांची थकबाकी आहे.
भारतातील शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण वाढण्यामागे प्रामुख्याने तीन कारणे आहेत.
1. शेतीमधून उत्पादन कमी होत आहे. पिकांची उत्पादकता दिवसेंदिवस घटत आहे.
2. उत्पादन खर्च वाढत आहे. खते, कीटकनाशके, अवजारे, इंधन, मजुरी यांचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.
3. कारण म्हणजे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे. कालबाह्य बियाणे आणि उत्पादन पद्धतीमुळे उत्पादकता कमी होत आहे.
नक्की वाचा - BMC Budget : झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून पालिकेला मिळणार 350 कोटी! काय आहे निर्णय?
राज्यातील थकीत कर्ज...
राज्य खातेधारक थकबाकी
महाराष्ट्र - 1.46 कोटी (शेतकऱ्यांची संख्या) - 7.38 लाख कोटी (थकबाकी)
तामिळनाडू 2.88 कोटी (शेतकऱ्यांची संख्या) - 3.48 लाख कोटी (थकबाकी)
आंध्र प्रदेश 1.57 कोटी (शेतकऱ्यांची संख्या) - 3.09 लाख कोटी (थकबाकी)
उत्तर प्रदेश 1.80 कोटी (शेतकऱ्यांची संख्या) - 2.30 लाख कोटी (थकबाकी)
राजस्थान 1.05 कोटी (शेतकऱ्यांची संख्या) - 1.75 लाख कोटी (थकबाकी)
कर्नाटक 1.61 कोटी (शेतकऱ्यांची संख्या) - 1.57 लाख कोटी (थकबाकी)
मध्य प्रदेश 99 लाख (शेतकऱ्यांची संख्या) - 1.50 लाख कोटी (थकबाकी)
तेलंगण 77 लाख (शेतकऱ्यांची संख्या) - 1.42 लाख कोटी (थकबाकी)
केरळ 1.02 कोटी (शेतकऱ्यांची संख्या) - 1.42 लाख कोटी (थकबाकी)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world