Beed Ahilyanagar Railway : बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण; अहिल्यानगरपर्यंत 45 रुपयात प्रवास, वेळ, थांबा सर्वकाही

Beed Ahilyanagar Railway : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचा शुभारंभ होणार असून अखेर बीडकरांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Beed Ahilyanagar Railway : बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचा शुभारंभ

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed Ahilyanagar Railway : बीडच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या प्रकल्पाचा पहिला टप्पा आजपासून (17 सप्टेंबर) सुरू होत आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचा शुभारंभ होणार असून अखेर बीडकरांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. 

25 वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड-अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्प गेल्या दोन वर्षांत वेगाने मार्गी लागला. बीड शहरातील पालवण चौकात उभारलेले भव्य स्थानक आता प्रवाशांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. पहिल्या टप्प्यात बीड ते अहिल्यानगर असा 168 किमीचा प्रवास रेल्वे साधारण 5 तास 30 मिनिटांत पूर्ण करणार आहे. या मार्गावर एकूण 16 स्थानकांवर रेल्वे थांबेल.

रेल्वेची वेळ काय असेल? 

बीड ते अहिल्यानगर रेल्वे सोमवार ते शनिवारपर्यंत धावेल. रविवारी ही रेल्वे धावणार नाही. रोज एक गाडी येणार , दररोज गाडी क्रमांक ७१४४१, सकाळी ६:५५ वाजता अहिल्यानगरवरुन निघेल आणि दुपारी १२:३० बीडला पोहोचेल. तिच गाडी क्रमांक ७१४४२, दुपारी १ वाजता बीडहून निघणार आणि सायंकाळी ६:३० वाजता अहिल्यानगरला पोहोचेल. 

गाडी क्रमांक - ७१४११ - अहिल्यानगर ते बीड - सकाळी ६.५५ ते दुपारी १२.३० वा.
गाडी क्रमांक - ७१४४२ - बीड ते अहिल्यानगर - दुपारी १.०० ते सायंकाळी ६.३० वा.

Advertisement

नक्की वाचा - Beed to Ahilyanagar Railway:बीडच्या विकासाचा गेमचेंजर प्रकल्प; अजित पवारांकडून 17 सप्टेंबरला मिळणार मोठं गिफ्ट

रेल्वेचा खर्च आणि रस्ते मार्गाचा खर्च, वेळ आणि तुलना

बीड स्टेशन शहरापासून ६ किलोमीटर दूर पालवण गावात आहे. बीड बस स्टँडपासून स्टेशनला रिक्षावाले १५०-२०० पैसे घेतात. बीड ते अहिल्यानगर तिकीट दर ४५ रुपये आहे. बीडे ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाने साडे पाच तास लागतात. 

Advertisement

तर दुसरीकडे रस्ते मार्गाने १२८ किलोमीटरसाठी साधारण ३ तास लागतील. बीड ते अहिल्यानगरला जाणाऱ्यासाठी बस भाडे २०० रुपयांपर्यंत आहे. 

बीड ते अहिल्यानगर थांबे कुठे असतील?

1 बीड 
2 राजुरी 
3 रायमोर 
4 विगणवाडी 
5 घाटनांदुर 
6 आंबळनेर 
7 बावी 
8 किणी 
9 आष्टी 
10 कडा 
11 धानोरा
12 सोलापूरवाडी 
13 लोणी 
14 नारायणडोह 
15 अहिल्यानगर


बीड ते अहिल्यानगर रेल्वे प्रकल्पाचे महत्त्वाचे मुद्दे

  • २६१ पैकी १६६ किलोमीटर लोहमार्ग पूर्ण
  • केंद्र-राज्याचा निम्मा वाटा असलेला प्रकल्प
  • ३५५ कोटींचा प्रकल्प ४८०० कोटींवर
  • राज्य सरकारकडून आतापर्यंत २२४१ कोटींचा निधी
  • अहिल्यानगर-बीडदरम्यान १६ स्थानके
  • आठवड्यात सहा दिवस धावणार रेल्वे (रविवारी सुट्टी)
  • ४५ रुपये तिकीट - ५ तास २५ मिनिटांचा वेळ
  • सध्या डिझेलवर धावणार रेल्वे