अहिल्यानगर शहर बसेसची दयनीय अवस्थेवर, "महापालिका ठेकेदारांना पोसण्याच काम करते", नितीन भुतारेंचा आरोप

जाहिरात
Read Time: 3 mins
अहिल्यानगर:

कुर्ल्यामधील भयंकर बस अपघाताने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता नगर शहरातील अनेक बस या धोकादायक तसेच शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसून आले आहे. यादरम्यान शहर बस सेवेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्ते नितीन भूतारे यांनी महापालिका प्रशासन तसेच परिवहन विभागावर घंभीर आरोप केले आहेत. यावर आता महापालिका आयुक्त  यशवंत डांगे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महानगरपालिकेची शहर बस सेवा ही बीओटी तत्त्वावरती दिपाली ट्रान्सपोर्ट या खाजगी कंपनीकडे चालविण्यासाठी दिलेली आहे. या कंपनीमार्फत शहरातील विविध मार्गावरती या बसेस धावतात. या बसेस मध्ये प्रामुख्याने प्रवास करणारे प्रवासी शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांचा मोठा समावेश असून यांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने ही शहर बस सेवा सुरू केली आहे. परंतु, आजच्या परिस्थितीत ही शहर बस सेवा शेवटची घटका मोजत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसची अवस्था दयनीय झाली आहे.

(नक्की वाचा: 'बिनबुडाचे अन् तथ्यहीन आरोप....', निर्मला सीतारमण यांनी राहुल गांधींना फटकारले)

    बसेसची अवस्था अतियश दयनीय असून त्या बस गाड्या भंगारात विकल्या जातील, अशी त्यांची स्थिती आहे. या बस गाड्या चालविणाऱ्या वाहन व चालक यांची खरी कमाल आहे. प्रवाशांना बसण्याच्या सिट तुटलेल्या अवस्थेत, बसच्या खिडक्यांना काचा नाही, अनेक बसमधील चढतानाचे  पायाऱ्यांचे पत्रा निघालेला आहे, तर गाड्यांची बॅटरी उघड्यावर दिसून आले. तरी, ठेकेदार या बसेस वापरत असून प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

    शहर बस सेवा अतिशय दयनीय अवस्थेत असून प्रवासी बसण्याच्या ठिकाणी पत्रा फाटलेल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना इजा होऊ शकते. बसेसचे टायरसुद्धा निकृष्ट आहेत ज्यामुळे प्रवास चालू असताना टायर फुटण्याची देखील शक्यता असून, यातून मोठा अपघात सुद्धा घडू शकतो. पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या या गाड्या असून रस्त्यावरती या गाड्यांचा वापर होणे देखील शक्य नाही

    Advertisement

    यावरुनच"महापालिका ठेकेदारांना पोसण्याच त्याचं काम करत असल्याचा", गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केला. 'मिल बाटके खायेंगे तो बरकत होगी' असा प्रकार सध्या महापालिका व शहर व सेवेच्या ठेकेदारांमध्ये चालू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केला.

    (नक्की वाचा: महायुतीचं ठरलं! अमित शाहांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; कोणाकडे किती खाती?)

     महापालिका आयुक्त यशवंत डांगेची प्रतिक्रिया 

    भुतारेंच्या आरोपांवर महापालिका आयुक्त यशवंत डांगेनी खुलासा केला आहे. या विषयावर बोलताना यशवंत डांगे म्हणाले की, शहर बस सेवा खाजगी सेवेमार्फत चालवली जाते. काही बसेसच्या काचा फुटल्या, पत्रे निघालेले दिसून आले तर काही बसमधील सीट्स खराब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तातडीने संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आलेली आहे. पुढील दहा दिवसात दुरुस्त करून प्रवाश्यांना चांगल्या पद्धतीचे सेवा उपलब्ध करून द्यावे असा आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आला आहे दहा दिवसात याची पूर्तता न झाल्यास ठेकेदारावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं देखील आयुक्तांनी सांगितले आहे.

    Advertisement