Ashok Kharat News: अशोक खरातचे VIDEO व्हायरल करत असाल तर सावधान! पोलिसांकडून दोघांना अटक

Ahilyanagar News: खरात प्रकरणातील पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, अहिल्यानगर

Ashok Kharat News Update: अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांच्या खासगी आयुष्याशी खेळणाऱ्या विकृतांविरुद्ध प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

दोघांना अटक, एक फरार

कोपरगाव पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी राहुल गंगाधर शिंदे आणि योगेश पंढरीनाथ आढाव या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर संदीप गर्जे  याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध सुरू आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा)

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, हे आक्षेपार्ह व्हिडिओ बीड येथून व्हायरल झाले होते. कोपरगाव येथील आरोपींनी हे व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आणि आपल्या मित्रांनाही पाठवले. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: गणितात मठ्ठ, भाषांचीही बोंब, भोंदूबाबाचा दहावीची रिझल्ट आला समोर, नावंही बदललं!)

पोलिसांचं नागरिकांना आवाहन 

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्यात आली आहेत. पीडित महिलांची ओळख उघड करणे किंवा त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ/फोटो शेअर करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. असे कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी असे कोणतेही व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Topics mentioned in this article