Ahilyanagar News : जिवंतपणी दहावं, सरपंचाच्या पत्नीनेही केलं पिंडदान; अहिल्यानगरच्या घटनेची राज्यभरात चर्चा

सरपंचांनी असं का केलं, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील नेवासातून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. नेवासा येथील सौंदाळा गावातील एका सरपंचाने जिवंतपणी स्वत:चाच दशक्रियाविधी केला, इतकच नाही तर त्यांनी पिंडदानही केलं. सध्या या दहाव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान सरपंचांनी असं का केलं, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

जिवंतपणी स्वत:चाच दशक्रियाविधी...

ही घटना अहिल्यानगरमधील नेवासामधील सौंदाळा गावातील आहे. सौंदाळा गावाचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वत:चा दशक्रिया विधी घातला. इतकच नाही तर त्यांनी पिंडदानही केलं. विशेष म्हणजे शरद आरगडे यांच्या पिंडाला कावळाही शिवला. आरगडे यांच्या पत्नी प्रियांका, मुलगा संग्राम यांनी स्मशानभूमीत सत्यशोधक पद्धतीने पिंडदान विधी केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. दरम्यान ही घटना सहज नाही. यामागे सरपंचांचा मोठा विचार असल्याचं समोर आलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्याच्या नगरसेविकेची जागतिक भरारी; संशोधनात मोठा पराक्रम, UK सरकारकडून पेटंटही बहाल

कावळ्याला माहीत नसतं माणूस मृत की जिवंत...

सरपंच आरगडे यांनी दशक्रियाविधी करीत सामाजिक रुढी आणि अंधश्रद्धेला तिलांजली दिली आहे. हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या निधनानंतर अनेक विधी केले जातात. यामध्ये दहाव्या दिवशी पिंडदान आणि उत्तरकार्य करण्याची पद्धत आहे. यासाठी अवाजवी खर्च केला जातो. त्यातही पिंड ठेऊन कावळा शिवण्याची वाट पाहिली जाते. जर कावळा शिवला नाही तर मृत व्यक्तीला मोक्ष मिळणार नाही अशी मान्यता असते. मात्र आरगडे यांनी या सर्व अंधश्रद्धेला तिलांजरी दिली आहे. ते म्हणतात. कावळ्याला माहीत नसतं माणूस मृत की जिवंत, त्याला फक्त भूक असते. बीबीसी मराठीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.