Pune News : पुण्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका नगरसेविकामुळे पुण्याचं नाव जागतिक पातळीवर नावाजलं गेलं आहे. जागतिक संशोधनात पुण्याच्या नगरसेविका अर्चना अमित जगताप यांनी तयार केलेल्या एका डिझाइनला आंतरराष्ट्रीय पेटंट बहाल करण्यात आलं आहे.
कोण आहेत अर्चना जगताप?
अर्चना जगताप या पुण्यातील कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी भागातील नगरसेविका आहेत. त्यांनी संशोधनात नवा पराक्रम केला आहे. अर्चना जगताप यांनी केलेल्या बायो-सिंक्रोनस कायनेटिक इक्विलिब्रियम सोल या अत्याधुनिक शूज सोलच्या डिझाइनला युनायटेड किंगडम सरकारने अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय डिझाइन पेटंट बहाल केलं आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे पुण्याच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बायो - सिंक्रोनस कायनेटिक इक्विलिब्रियम सोल नेमकं काय आहे?
बायो - सिंक्रोनस कायनेटिक इक्विलिब्रियम सोल प्रामुख्याने खेळाडू आणि धावपट्टूंच्या शारिरीक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. अर्चना जगताप यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.
Bio-Synchronous (बायो-सिंक्रोनस): आपल्या शरीराच्या नैसर्गिक हालचालींशी जुळवून घेणारे.
Kinetic (कायनेटिक): हालचालीतून निर्माण होणारी ऊर्जा.
Equilibrium (इक्विलिब्रियम): अचूक समतोल (Balance).
Sole (सोल): बुटाचा तळ.
“हे एक असे ‘स्मार्ट शूज सोल' आहे, जे माणूस धावताना किंवा खेळताना त्याच्या पायांच्या हालचालींनुसार स्वतःला ॲडजस्ट करते. साधारण सोल्समध्ये पाय लचकण्याची किंवा ऊर्जेचा अपव्यय होण्याची भीती असते, पण आमचे हे डिझाइन शरीराचा समतोल (Balance) राखते आणि जमिनीकडून पायाला मिळणारा धक्का (Impact) कमी करते. थोडक्यात सांगायचे तर, हे सोल खेळाडूंची कार्यक्षमता वाढवते आणि दुखापतींपासून संरक्षण देते.”
नॅचरल फील: हे सोल पायाला नैसर्गिक हालचाल करण्यास वाव देते, ज्यामुळे थकवा कमी जाणवतो.
एका वाक्यात सांगायचे तर: “हे मानवी शरीरशास्त्र आणि गतीशास्त्र यांचा मेळ घालून तयार केलेले जगातील प्रगत दर्जाचे बुटाचे तळ (Sole) आहे, ज्याला आता ब्रिटन सरकारने मान्यता दिली आहे.”
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world