
BJP MLA Shivajirao Kardile Passed Away: एकीकडे आजपासून दिवाळीचा उत्सव सुरु होत असतानाच नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे लोकनेते, राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरच्या राजकारणातील धुरंधर नेत्याचा, सरपंच ते माजी मंंत्री असा संघर्षमय प्रवास आज संपला अशा भावना व्यक्त होत आहेत.
नगरच्या राजकारणातील धुरंधर हरपला
शिवाजीराव कर्डिले यांनी नगरच्या राजकारणात आपले वर्चस्व निर्माण केले होते. नगरच्या सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता. शिवाजीराव कर्डिले यांनी सरपंच ते मंत्रिपद असा यशस्वी राजकीय प्रवास केला होता. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच म्हणून ते पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून त्यांनी नगरच्या राजकारणात वारंवार आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले.
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख… pic.twitter.com/IKXzPNmG8t
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 17, 2025
सरपंच ते मंत्री
शिवाजीराव कर्डिले हे दूध व्यावसायिक होते. 2009 मध्ये ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता, २०१४ ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. २०१९ निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभाही घेतली होती. शरद पवारांचे विश्वासू प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करत त्यांनी आमदारकी मिळवली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world