जाहिरात

Shivajirao Kardile News: नगर जिल्ह्यावर शोककळा! भाजप आमदार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

नगर शहाराजवळ असणाऱ्या बुBJP MLA Shivajirao Kardile Death: नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. ऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 

Shivajirao Kardile News: नगर जिल्ह्यावर शोककळा! भाजप आमदार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

BJP MLA Shivajirao Kardile Passed Away:  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे  भाजपचे विद्यमान आमदार होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. (Rahuri MLA Shivajirao Kardile Death) 

जनसामान्यांचा नेता हरपला...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार, राज्याचे माजी मंत्री आणि नगर जिल्ह्यातील मोठे नेते शिवाजीराव कर्डिले यांचे दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. 

Jalna ACB Raid: 'दुनिया सांगे ब्रम्हज्ञान..', लाचखोर आयुक्तांचा धक्कादायक प्रताप, 2 दिवसांपूर्वी काय घडलेलं?

सरपंच ते राज्याचे मंत्री..

शिवाजीराव कर्डिले हे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला होता. शिवाजीराव कर्डिले हे नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे राहणारे होते. बुऱ्हाणगावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास राहिला आहे. 

 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. शिवाजी कर्डिले हे २००९ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता..२०१४ ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.

Jalna News: महापालिका आयुक्त रंगेहाथ ACB च्या जाळ्यात, लाचेची रक्कम ऐकून घाम फुटेल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com