साताऱ्यातील कराड विमातळावर विमान कोसळलं, ट्रेनी पायलट जखमी

कराडमधील दमानिया अॅम्बिसिअन्स फ्लाईंग क्लबच्या विमानाला अपघात झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

साताऱ्यातील कराड विमानतळावर ट्रेनिंग विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एक प्रशिक्षणार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  प्रशिक्षणार्थी वैमानिकाला विमान कंट्रोल न झाल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. वारुंजी गावालगत असलेल्या विमानतळाच्या दक्षिणेकडीळ भिंतीजवळ हे विमान अपघातग्रस्त झालं. विमानाने कोसळ्यानंतर पेट घेतला नाही, यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

कराडमधील दमानिया अॅम्बिसिअन्स फ्लाईंग क्लबच्या विमानाला अपघात झाला आहे. मुंबईच्या या क्लबने आठ महिन्यांपूर्वीच कराडमध्ये आपल्या प्रशिक्षण केंद्र सुरु केलं होत. पहिल्या बॅचचे 20 प्रशिक्षणार्थी याठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. सध्या सर्वांना सोलो ट्रेनिंग दिलं दात होतं. मात्र ट्रेनिंगदरम्यान ही घटना घडल्याने सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

नक्षलग्रस्त दुर्गम भागातील आदिवासींना ना उमेदवार माहीत ना निवडणूक चिन्ह

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात होण्याआधी विमान हवेत हेलकावे खात होतं. कराड विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील उंच इमारती, उंच टॉवर्स आणि डोंगर यामुळे इथे विमानाचं लँडिंग करणे वैमानिकांसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे भविष्यातही याठिकाणी मोठ्या दुर्घटनांचा धोका वर्तवला जात आहे.  

विद्यार्थ्यांच्या भगव्या ड्रेसवर प्रश्न विचारणं पडलं महाग, जमावाकडून शाळेची तोडफोड

विमानतळ प्रशासनाकडून कुणीही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र विमान प्रशिक्षण केंद्राच्या सूत्रांनी सांगितली की, ही मोठी दुर्घटना नाही. प्रशिक्षणार्थी पायलटला विमान कंट्रोल न झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून बाजूला जात मातीत शिरलं. तिथे विमानाजी चाके मातीत चाम झाली आणि विमान उलटलं. 

Advertisement
Topics mentioned in this article