'लोकसभेला थोडं दुर्लक्ष झालं...' अजित पवारांनी दिली फडणवीस-शिंदेंसमोर कबुली

Ajit Pawar on Loksabha Election : या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली.

Advertisement
Read Time: 2 mins
सातारा:


छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमधून आणलेली वाघनखं सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ही वाघनखं सध्या ठेवण्यात आली आहेत.  या कार्यक्रमाचं उद्धघाटन शुक्रवारी (19 जुलै) झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वाघनखांवरील टीका दुर्दैवी

अजित पवार यांनी या भाषणाच्या सुरुवातील वाघनखांच्या सत्यतेवरील वादावर टीका केली. 'वाघनखांबद्दल महाराष्ट्रात बरीच चर्चा सुरु आहे. काही चांगलं घडत असेल तर त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न काही जण करतात. त्यामध्ये त्यांना काय समाधान मिळतं माहिती नाही. ही टीका-टिप्पणी करणारे अनेक जण विदेशात गेल्यानंतर लंडनला गेल्यानंतर वस्तूसंग्रहालयात जातात. तेथील कोहिनूर हिरा बघतात. तिथं जगातल्या वस्तू बघतात. महाराष्ट्र सरकारनं पुढाकारानं, मुनगंटीवार साहेबांच्या पुढाकारानं महाराष्ट्रात आले आहेत. नव्या पिढीला हा इतिहास कळला पाहिजे. त्यांनाही प्रेरणा मिळाली पाहिजे. त्यासाठी ही वाघनखं इथं खास लंडनहून आणून इथं प्रदर्शनासाठी ठेवली आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : 'लंडनमधून आणण्यात येणारी वाघनखं महाराजांची नाहीत', खळबळजनक दावा )
 

'जन्मात एकदा तरी वाघनखं बघा'

आई-बापांनी तुम्हाला जन्माला घातलंय. या जगातून जाण्याआधी एकदा तरी वाघनखं बघा, असं आवाहान अजित पवार यांनी केलं. देशात अनेकांची राज्य झाली. पण, कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य भोसलेंचं राज्य म्हणून म्हंटलं गेलं नाही. ते रयतेचं राज्य झालं. जगामध्ये रयतेचं राज्य म्हणून फक्त शिवाजी महाराजांच्या राज्याकडं पाहिलं जातं. आजही हे सरकार सर्वसमान्यांसाठी काम करतंय. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतंय, हे त्यांनी शेरोशायरीतून सांगितलं.