Ajit Pawar Death : अजित दादांच्या खुर्चीला घट्ट मिठी मारली; पार्थ पवारांना अश्रू अनावर, Video

पार्थ पवार यांनी दादा बसत असलेल्या त्या खुर्चीला मिठी मारली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. हुंदके देत पार्थ पवार यांनी दादांच्या आठवणी जागवल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने अख्ख्या महाराष्ट्राला रडवलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेल्या अजित पवारांच्या विमानाचा बारामतीत अपघात झाला. ज्या जमिनीसाठी ते आयुष्यभर राबले, शेवटी त्याच मातीत त्यांचा शेवट झाला. दादांच्या अंत्यसंस्कारावेळी अख्खा महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं. महाराष्ट्रासाठी हा झटका अत्यंत त्रासदायक होता, अशावेळी त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाही. 

सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारीला शोकाकूल स्थितीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज त्यांचा मुलगा पार्थ पवार मुंबईतील पक्ष कार्यालयातील अजित पवारांच्या केबिनमध्ये पोहोचला. ज्या केबिनमध्ये अजित पवारांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या केबिनमध्ये पाऊल ठेवताच पार्थ पवार यांना गहिवरुन आले. सुरुवातील त्याने दादांच्या फोटोचं दर्शन घेतलं. शेवटी पार्श पवार दादांचा स्पर्श असलेल्या खुर्चीपाशी आले. पार्थ पवार यांनी दादा बसत असलेल्या त्या खुर्चीला मिठी मारली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. हुंदके देत पार्थ पवार यांनी दादांच्या आठवणी जागवल्या.
 

नक्की वाचा - Rajya Sabha MP : राज्यसभेतील खासदारकी कुणाला? पार्थ की जय पवार, बारामतीकरांच्या मनात कोण?

त्यानंतर अस्थी कलशाचे दर्शन घेतले. याशिवाय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही दर्शन घेतले. आजपासून पक्ष कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्यात दादांच्या अस्थी कलशामधून नेताना पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सना मलिक शेख, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आदींसह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement