Shocking Death Of Ajit Pawar: मुश्रीफ ढसाढसा रडले. देशमुख बोलूच शकले नाही; अजित पवारांच्या निधनाने जबर धक्का

Ajit Pawar Death: या अपघातामध्ये अजित पवारांसह तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. हे वृत्त अनेकांसाठी जबर धक्का देणारे होते.  

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी म्हणजेच 28 जानेवारी रोजी निधन झाले. एका विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. बारामतीकडे येत असताना त्यांचे विमान बारामतीजवळ कोसळले. अंदाजे 100 फुटावरून त्यांचे विमान कोसळल्याची माहिती मिळते आहे. विमानात नेमका काय बिघाड झाला होता, हे अद्याप कळू शकलेलं नाही. या अपघातामध्ये अजित पवारांसह तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. हे वृत्त अनेकांसाठी जबर धक्का देणारे होते.  

नक्की वाचा: राजकारणातील 'धुरंदर दादा' काळाच्या पडद्याआड! DCM अजित पवार यांचे निधन; महाराष्ट्रावर शोककळा

हसन मुश्रीफ हमसून हमसून रडले

अजित पवारांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्यांचे पक्षातील सहकारी नेते हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले होते. माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. अजित पवारांचे निधन झाल्याचा जबर धक्का बसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत राहिलेले नेते अनिल देशमुख हे देखील ढसाढसा रडताना बघायला मिळाले. ही बातमीच इतकी धक्कादायक होती की अनेकांना त्यावर विश्वास बसत नव्हता. विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक बातमी आल्यानंतर अजित पवार सुखरूप असतील किंवा त्यांना  किरकोळ दुखापत झाली असावी असं वाटत होतं, मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. 

नक्की वाचा: अजित पवारांसह 3 जणांचा मृत्यू, PTI ची माहिती

जमिनीवर कोसळताच विमानाने पेट घेतला

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमानाचे लँडीग होऊ शकले नव्हते.  अंदाजे 100 फुटावरून विमान कोसळलं असावं. विमान कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला. विमानामध्ये अजित पवार होते हे माहिती होतं मात्र आम्ही वाचवू शकलो नाही कारण विमानाने पेट घेतला होता असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले की, "पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी अजित पवारांना भेटलो होतो, ती भेट शेवटची ठरली. आमदार असताना मी अजित पवारांच्या अत्यंत जवळचा होतो. त्यांचे प्रेम माझ्यावर कायम होतं."