Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. दादा रस्तेमार्गानंच बारामतीला जाणार होते, पण ऐनवेळेस तो फोन आला आणि विमान प्रवासाची प्लान ठरल्याची माहिती प्रमोद हिंदूराव यांनी दिलीय.
प्रफुल पटेल की कोणाचा तरी फोन आला...: प्रमोद हिंदुराव यांचा धक्कादायक दावा
एका शोकसभेत बोलत असताना प्रमोद हिंदुराव म्हणाले की, "कार्यालयातून माझ्याकडे अजित पवारांचा दरदिवसाचा कार्यक्रम यायचा. तर मनवे म्हणून त्यांचा ड्रायव्हर कम शिपाई असं सर्वच काम पाहायचा. ज्या दिवशी त्यांना जायचं होतं, त्याच्या आदल्या दिवशीच आपण बाय रोडने जायचे अशी त्यांची तयारी झाली होती. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल पटेलसाहेब की काय कोणाचा तरी त्यांना फोन आला होता, की माझं काहीतरी काम आहे, मंत्रालयातील ती फाइल क्लिअर करायचीय. म्हणून त्यांनी सेक्रेटरीला फोन केला आणि कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. कारण पुन्हा मी आठवडाभर नाही, इलेक्शनला जाणार आहे. फाइल आणायला 7.30-8 (PM) वाजले. मग त्यांनी ड्रायव्हरला गाडीतून बॅग्स काढायला सांगितलं". माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेत बोलत असताना हिंदुराव यांनी हे धक्कादायक विधान केले आहे.
(नक्की वाचा: Ajit Pawar Death News: अमोल मिटकरींचा नवा खळबळजनक दावा, आता थेट मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र; पत्रात काय दडलंय?)
दरम्यान प्रमोद हिंदुराव यांच्या विधानामध्ये प्रफुल पटेल यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण दादांना ऐनवेळेस फोन करणारी ती व्यक्ती कोण होती? याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.
प्रमोद हिंदुराव नेमके काय म्हणाले, ऐका संपूर्ण व्हिडीओ | Pramod Hindurao Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world