जाहिरात

Ajit Pawar:अजित पवार आणि 12 फेब्रुवारीचा मोठा निर्णय, शरद पवारांजवळच्या नेत्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे खळबळ

Ajit Pawar NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांचे जवळचे मानल्या जाणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतंय.

Ajit Pawar:अजित पवार आणि 12 फेब्रुवारीचा मोठा निर्णय, शरद पवारांजवळच्या नेत्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे खळबळ
"Ajit Pawar NCP Merger: राशपच्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत"
Ankush Kakade And NDTV Marathi
  • अंकुश काकडे यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत
  • अजित पवार 12 फेब्रुवारीला महत्त्वाचा निर्णय घेणार होते: अंकुश काकडे
  • 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय जाहीर होण्याची योजना होती, पण 28 जानेवारीला अजित पवारांचे निधन झाले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Ajit Pawar NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रवक्ते अंकुश काकडे यांनी गुरुवारी (12 फेब्रुवारी) अजित पवारांसंदर्भात ठेवलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतंय. अजित पवार यांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाबाबत कशा पद्धतीने हालचाली सुरू होत्या, याचा काकडे यांनी थोडक्यात उलगडा पोस्टद्वारे केलाय. "आज दादा तुम्ही हवे होतात, एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही करणार होतात", अशा आशयाचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अंकुश काकडे यांनी ठेवलंय. 

अंकुश काकडे यांनी 12 फेब्रुवारीचा संपूर्ण प्लानच सांगितला

यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतानाही अंकुश काकडे म्हणाले की, "कुठे माशी शिंकली हे मला माहिती नाही, त्यावेळेला ते (अजित पवार) सर्वांच्या देखत बोलले होते. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या. पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणे 5 फेब्रुवारीला मतदान होणार होते आणि 7 फेब्रुवारीला निकाल लागणार होते. दुर्देवानं 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झाले. जयंत पाटलांनीही सांगितलं होतं की दादांची आणि आमची सखोल चर्चा झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर 7-8 फेब्रुवारीला विलीनीकरणाची जाहीर वाच्यता केली जाणार होती. पण त्यावेळेला दादांसाठी ती तारीख सोयीची नव्हती कारण ते दिल्लीला जाणार होता. जयंतरावांनाही सोयीची नव्हती, त्यावेळेस दादा म्हणाले ठीकेय जयंतरावांना जी तारीख हवी असेल त्या दिवशी एकत्रि‍करणाचा निर्णय करू. माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 फेब्रुवारी ठरली होती. पण दुर्दैवानं 28 तारखेची दुर्घटना घडली. आज जर दादा आपल्यामध्ये असते तर या दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालं असतं. दुर्दैवानं दादा आज नाहीत आणि हे विलीनीकरण होत नाहीय, ही खंत देखील आमच्या मनामध्ये आहे". 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Ankush Kakade Status

(नक्की वाचा: Ajit Pawar Death News: अमोल मिटकरींचा नवा खळबळजनक दावा, आता थेट मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र; पत्रात काय दडलंय?)

शरद पवार यांनीही 12 फेब्रुवारीचा केला होता उल्लेख

दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांनी 31 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विलीनीकरणाच्या तारखेबाबत माहिती दिली होती. शरद पवारही म्हणाले होते की, "विलीनीकरणाचा निर्णय 12 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होता. अजित यांनी ही तारीख दिली होती, पण दुर्दैवाने ही दुर्घटना घडली. अजित पवार यांच्या निधनामुळे दोन्ही विलीनीकरणाच्या प्रक्रियेत आता अडचण येऊ शकते, असेही ते म्हणाले होते. 

(नक्की वाचा: Sharad Pawar Health Updates: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी अपडेट, रुबी हॉल क्लिनिकने काय म्हटलं?)

विलीनकरण व्हावं ही अजित पवारांची इच्छा : शरद पवार

"अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वात मागील चार महिन्यांत दोन्ही गटाच्या विलीनीकरण प्रक्रियेवर चर्चा सुरू होती. सर्व चर्चा त्यांच्या स्तरावर झाली होती. चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात होती. पण दुर्घटनेमुळे प्रक्रिया वाईटरित्या प्रभावित झालीय. दोन्ही गटाने एकत्रित यावी, ही अजित यांची इच्छा होती आणि त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, ही आमची अपेक्षा आहे", असंही शरद पवार म्हणाले होते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com