जाहिरात

Supriya Sule: सुप्रिया सुळेंना रोहित पवारांची काळजी! राज्य सरकारकडे केली मोठी मागणी, म्हणाल्या...

सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. 

Supriya Sule: सुप्रिया सुळेंना रोहित पवारांची काळजी! राज्य सरकारकडे केली मोठी मागणी, म्हणाल्या...

Supriya Sule On Rohit Pawar Security:  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात नव्हे तर घातपात आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार करत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन रोहित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी दोनवेळा अभ्यासपूर्ण पत्रकार परिषद घेत या दुर्घटनेवरुन गंभीर सवाल केले. अशातच रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करत असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

"आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. 

ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे," अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. 

Cabinet Reshuffle: 'महायुती'मध्ये भाकरी फिरणार? शिवसेनेच्या या 2 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?

रोहित पवार यांच्या जिवाला धोका... ? 

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील माने यांनीही याबाबत महत्त्वाचे विधान केले होते. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अनेक मुद्दे रोहित पवारांनी मांडलेत. धक्कादायक खुलासे यात होत आहेत. काही लोकांना किंवा घटकांना ही माहिती लोकांपर्यंत जाऊ नये, असे वाटते. अशा घटकांकडून रोहित पवारांना धोका आहे, अशी माहिती आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आम्ही झेड प्लस सुरक्षेची मागणी केली आहे. या राजकीय नव्हे तर व्यावसायिक लोक असण्याची शक्यता आहे. लवकरच आमच्या पक्षाच्या आमदार आणि पदाधिकारी या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com