Ajit Pawar Passes Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सून्न झाला आहे. अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला धक्का बसलाय. दरम्यान विमानात बसण्यापूर्वी अजित पवार यांनी शेवटचा फोन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना केला होता. अजित पवार यांचा हा शेवटचा फोन असल्याचं म्हटलं जातंय. यानंतर बारामतीमध्ये विमान लँडिंग झाल्यानंतर पुढील बोलणं होणार होतं, अशी माहिती समोर आलीय. दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले होते, याबाबत माहिती समोर आलेली नाही. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आत्या आहेत. राणाजगजीतसिंह पाटील हे कुटुंबासह बारामतीकडे रवाना झाले आहे.
मी दमदार दिलदार मित्र गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शीने संपूर्ण माहिती सांगितली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world