Ajit Pawar Death: अपघाताच्या दिवशी पायलट पहाटे 5वाजेपासून कोणाच्या संपर्कात? अमोल मिटकरींनी थेट नावंच घेतली

Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्या दोन पायलट्सचे सीडीआर तपासण्याची मागणी केलीय. मिटकरींनी पुन्हा एकदा मोठा संशय व्यक्त केलाय, वाचा सविस्तर

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ajit Pawar Death: CDR जरी काढला तरी बरच चित्र क्लीयर होईल: अमोल मिटकरी"
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • NCP आमदार अमोल मिटकरी यांनी दोन पायलट्सच्या सीडीआरची मागणी केलीय
  • पायलट्स पहाटे 5 वाजेपासून कोणाच्या तरी संपर्कात असल्याचा मिटकरींचा दावा
  • अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Ajit Pawar Death News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari News) यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत. मिटकरी यांनी असा दावा केला आहे की, 28 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपासून पायलट कोणाच्या तरी संपर्कात होते. केवळ कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) काढल्यास अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, वैमानिकांच्या कॉल डिटेल्सची चौकशी केल्यास अपघाताशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते, असे म्हटले आहे.

कधी येणार विमान अपघाताचा पहिला अहवाल?

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध केला जाईल. 28  जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला होता. पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, "घटनेच्या दिवसापासून एक महिन्याच्या आत म्हणजेच 28 फेब्रुवारीपर्यंत प्राथमिक अहवाल सादर केला जाईल."

अमोल मिटकरी यांचा खळबळजनक दावा

अपघाताबाबत विविध शंका-प्रश्न

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका-प्रश्न उपस्थित केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन विमान कंपनीशी संबंधित काही अनियमितता आणि तांत्रिक त्रुटींचा दावा केला होता. त्यांनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली आहे. शनिवारी (21 फेब्रुवारी) रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी केली की, जोपर्यंत अपघाताची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांचा राजीनामा घेण्यात यावा.

(नक्की वाचा: Rohit Pawar: अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? रोहित पवारांच्या आरोपाला सरकारचं उत्तर, तपासला नवी दिशा)

(नक्की वाचा: Ajit Pawar Death: सत्य जाणून घेण्याचा हक्क, अजित पवार अपघातप्रकरणी जय पवारांची पहिली प्रतिक्रिया; VSRबद्दल मोठी मागणी)

रोहित पवार यांनी पत्रात म्हटलंय की, "व्हीएसआर (VSR) कंपनी आणि राममोहन नायडू यांचा पक्ष (TDP) यांच्यातील संबंधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संबंधांची चौकशी एखाद्या स्वतंत्र आणि सक्षम प्राधिकरणाद्वारे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने केली जावी." या पत्राची एक प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवण्यात आली आहे.

Advertisement