Ajit Pawar Plane Crash CCTV Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे CCTV फुटेज समोर

Ajit Pawar Plane Crash CCTV Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे CCTV फुटेज समोर

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ajit Pawar Plane Crash CCTV Video: अजित पवार यांच्या विमान अपघाताचे CCTV फुटेज समोर"
PTI And NDTV Marathi

Ajit Pawar Plane Crash CCTV Video: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, अजित पवार यांचे विमान जमिनीवर आदळलं आणि मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीच्या ज्वाळा पसरल्या. भीषण अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झालाय.  सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात झाल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालीय.  

बारामती विमान दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू

अजित पवार बारामतीमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार होते. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी दाखल झाले, पण तोवर बराच उशीर झाला होता. विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. विमानाचे दोन भाग झाले होते. या दुर्घटनेतील सर्व मृतदेह वाईटरित्या जळलेले होते.  

(नक्की वाचा: Ajit Pawar Death:अजित पवारांचे निधन,संपूर्ण महाराष्ट्र सून्न! अपघातग्रस्त विमानाचे एक-एक फोटो पाहताना येईल रडू)

Ajit Pawar Plane Crash CCTV Video पाहा

(नक्की वाचा: Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, राज ठाकरेंची भावुक पोस्ट)

व्हिडीओमध्ये काय आहे?

विमान जसे जमिनीवर आदळले तसा मोठा स्फोट झाला. आगीचा भडका उडला, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरले. विमानाचे तुकडे सर्वत्र विखुरले गेले. दुर्घटनास्थळी कागदपत्र आणि फाइल पडलेल्या होत्या. दुर्घटनेनंतर मृतदेह बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

Advertisement

बारामतीतील हॉस्पिटलमध्ये जसे अजित पवार यांचा मृतदेह पोहोचला तसे त्यांच्या समर्थकांच्या अश्रूंचा बांध फुटला. आपल्या लाडक्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी समर्थकांनी तेथे गर्दी केली होती.