Ajit Pawar Death CID Investigation: संशयाचे धुके, तऱ्हेतऱ्हेचे आरोप; सीआयडी नेमका काय तपास करणार ?

Ajit Pawar Death: बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण विमान अपघाताचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण विमान अपघाताचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे. या अपघाताबाबत काही राजकीय नेत्यांनी आणि सोशल मीडियावर अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. हे आरोप होत असताना सदर दुर्घटनेचा तपास सीआयडी देण्यात आला आहे.  पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, हे प्रकरण आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे. 

नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचा अपघात की घातपात? लोकांच्या मनातील कलह दूर करावा: विजय वडेट्टीवार

सीआयडीच्या तपासात प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे:

1. अजित पवारांच्या विमानासोबत घातपात झाला का? (Sabotage Theory)

अजित पवार यांनी मुंबईतून उड्डाण करण्यापूर्वी विमानाशी कोणी छेडछाड केली होती का? हा सीआयडीच्या तपासातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल. इंजिन, कंट्रोल सिस्टिम किंवा विमानातील सुरक्षेशी संबंधित उपकरणांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड केला गेला होता का, याची तांत्रिक तज्ञांच्या मदतीने तपासणी केली जाईल.

2. नेमकी चूक कोणाची?

विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांना 15,000 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. इतक्या अनुभवी वैमानिकाकडून चूक होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. त्यामुळे मानवी चूक (Human Error) की यंत्रणेतील बिघाड, हा संभ्रम सीआयडी दूर करण्याचा प्रयत्न करेल.

3. लँडींगच्यावेळी काय झाले ?

विमान लँडिंगच्या अगदी जवळ असताना नेमकं काय घडलं? एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सोबत झालेला शेवटचा संवाद आणि विमानाचा रडारवरील मार्ग याची बारकाईने तपासणी केली जाईल.

Advertisement

नक्की वाचा: Ajit Pawar News: रक्तरंजित राजकारण!..तर CCTVतील विमान घिरट्या घालतानाचं फुटेज स्पष्ट कसं? सुषमा अंधारेंचा सवाल

4. कागदपत्रांची पडताळणी

विमानाचे मेन्टेनन्स रेकॉर्ड्स, फिटनेस सर्टिफिकेट आणि उड्डाणापूर्वीची तपासणी नियमानुसार झाली होती का, याची सर्व कागदपत्रे सीआयडीने पुणे ग्रामीण पोलिसांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

5. घातपाताचे राजकीय आरोप

या अपघाताबाबत सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जे विविध आरोप केले जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही संशयास्पद हालचालींची किंवा विमानाजवळ वावरलेल्या व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
 

Advertisement