महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी धडकली होती. थोड्याचवेळात त्यांचे या अपघातात निधन झाल्याचीही बातमी धडकली. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रचंड धक्कादायक होती. अजित पवार हे सकाळी 8.10 च्या सुमारास मुंबईहून निघाले होते आणि ते बारामतीमध्ये 8.50 ला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र बारामतीजवळ विमान येताच त्यांच्या विमानाला अपघात झाला ज्यात अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला.
नक्की वाचा: हसन मुश्रीफ ढसाढसा रडले. देशमुख बोलूच शकले नाही; अजित पवारांच्या निधनाने जबर धक्का
सुरक्षारक्षकासह विमानातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे VSR कंपनीच्या विमानाने मुंबईहून बारामतीला येत होते. सकाळी 8.50 च्या सुमारास ते बारामतीला पोहोचणे अपेक्षित होते. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षक आणि वरिष्ठ हवालदार विपीद जाधव होते. विमानाचे पायलट सुमित कपूर होते, तर सहवैमानिक संभवी पाठक होत्या. पिंकी माळी या विमानामध्ये फ्लाईट अटेंडंट म्हणून होत्या.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला ?
अजित पवारांचे विमान बारामतीजवळ आल्यानंतर त्यामध्ये बिघाड झाल्याचे कळते आहे. अंदाजे 100 फुटांवरून विमान कोसळले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. विमान कोसळताच त्याने पेट घेतला, ज्यामुळे बचावासाठी वेळच मिळाला नाही. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, तो लक्षात आल्याने पायलट सुमित कपूर यांनी इमर्जन्सी लँडींगची परवानगी मागितली होती आणि ती देण्यातही आली होती. हे लँडींग करत असतानाच अपघात झाल्याचे कळते आहे.
नक्की वाचा: घिरट्या घेतल्या, 100 फुटांवरुन कोसळलं.. अजित पवार यांचा विमान अपघात कसा झाला?
असा होता अजित पवारांचा बारामतीमधला आजचा कार्यक्रम
08.45
मोटारीने प्रयाण
सहयोग निवासस्थान, भिगवण रोड, बारामती, जि. पुणे आगमन व राखीव
10.00
मोटारीने प्रयाण
निरावागज ग्रामपंचायत कार्यालय समोर, निरावागज, ता. बारामती, जि.पुणे येथे आगमन
10.00
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभा : निरावागज
12.00
मोटारीने प्रयाण
बाजारतळ, पणदरे, ता. बारामती, जि. पुणे येथे आगमन
12.00
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभा : पणदरे
01.00
मोटारीने प्रयाण
श्री. सतिश रामचंद्र सकुंडे यांचे निवासस्थान, वाघळवाडी, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे येथे आगमन
01.00
राखीव (श्री. सतिश रामचंद्र सकुंडे )
03.00
मोटारीने प्रयाण
बाजारतळ, करंजेपुल, ता. बारामती, जि. पुणे येथे आगमन
03.00
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभा : करंजेपुल
05.30
मोटारीने प्रयाण
चांदगुडे आर्केड, बस स्टैंड समोर, सुपा, ता. बारामती, जि. पुणे येथे आगमन
05.30
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभा : सुपा