रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातात घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. रोहित पवारांनी सविस्तर माहिती देत याबाबत धक्कादायक दावे केले आहेत. अजित पवारांचा १०० टक्के घातपात असू शकतो असा संशय रोहित पवारांनी केला आहे.
अजित दादांचा घातपाताची शक्यता असलेली कारणं...
१ दादांचा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे, पायलट बदलणे
विमान प्रवासाटी पूर्वीची नियोजित वेळ ७ ची होती, तर पायलटने ६.३० वाजता येणं अपेक्षित होतं. त्याने वाहतूक कोंडीचं कारण सांगितलं, मात्र एवढ्या सकाळी कुठे ट्रॅफिक होतं. जे पायलट आले नाहीत त्यांचे सीडीआर काढण्यात यावेत. तसेच पायलट वाहतुकीच्या कारणाने आले नसतील तर ट्रॅफिक कॅमेरा प्रमाणे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे. एवढ्या सकाळी ट्रॅफिक होतं का? दोन्ही पायलट राहायला कुठे होते, कोणत्या मार्गाने येत होते. त्या मार्गावर ट्रॅफिक होतं का? आधीचे दोन्ही पायलट ट्रॅफिकमध्ये अडकले होते का? की एक पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला होता, ट्रॅफिकमध्ये अडकले होते, त्याचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक का केला नाही? एकच पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला असेल तर दोन्ही पायलट का बदलले गेले. नव्या पायलटला केव्हा कळवण्यात आले, कळवण्यात आले तेव्हा नवे पायलट त्याच ठिकाणी होते की घरी होते. घरी असतील तर त्यांचे घर कुठे होते, त्यांना किती वेळ लागला, तिथं ट्रॅफिक नव्हता का? त्याच ठिकाणी होते तर मग त्याआधी ते कुठली फ्लाइट करुन आले होते. त्यांचा एफटीएल किती होता? दोन्ही पायलट ऐनवेळी बदलले तेव्हा त्यांच्या सर्व टेस्ट केल्या होत्या का? त्याचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत? मुख्य पायलट इंटरनॅशनल फ्लाइटवरुन आले होते, हे खरे आहे का? कुठल्या देशातून आले होते?
२ केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल, ATC Transcript मधील वेळेच्या विसंगती
केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आणि एटीएस Transscript मधील विसंगती असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्राच्या अहवालानुसार, ८.१८ मिनिटात विमान बारामती एटीएसच्या संपर्कात आले. बारामती एटीएस नुसार, ८.१९ मिनिटात संपर्क झालेला दिसतो. एक मिनिटाची विसंगती दिसत असली तरी एक मिनिट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.. विमानप्रवासात सेकंदाला किंमत असते. अवघ्या चार ते पाच सेकंदात विमान कोसळतं.
३ फ्लाइट रडारचा एक मिनिट आधीच बंद पडलेला डेटा
रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट रडारचा सिग्नल ८.४३.१९ ला तुटला आहे. हा सिग्नल एक मिनिट आधी का तुटला असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. विमानाता transponders एक मिनिट आधी मुद्दामहून बंद केला होता का?
४ दृश्यमानता कमी असताना लँड करणे
विमान उतरवण्यासाठी दृश्यमानता किमान ५ किलोमीटर असणे गरजेचे असते. Transcript नुसार ८.३१.११ सेकंद पायलटने दृश्यमानता विचारली असता एटीसीकडून ती किलोमीटर असल्याचे स्पष्ट सांगितले होते. तरीदेखील लँडिंगसाठी विमान बारामतीकडे का नेण्यात आलं? ८.३१ ला विमान यवतच्या पुढे असावे तिथून परत पुण्याकडे जाण्याचा निर्णय का घेण्यात का आला नाही?
५ रनवे ११ वर उतरवण्याचा आग्रह
बारामती विमानतळावर रनवे ११ आणि रनवे २९ धावपट्टीच्या दोनी बाजूने विमान उतरवता येतं. रनवे २९ वर टेबल टॉप नाही आणि रनवे ११ टेबल टॉप आहे. त्यामुळे रनवे ११ अधिक सुरक्षित मानलं जातं. ८.३६.३८ Aircraft ने Go Around करत असल्याचे सांगत रनवे २९ च्या लेफ्ट बेस जॉइन करत असल्याचं सांगितलं. रनवे २९ वर जर विमान उतरवले असते तर ८.३७ ला दादा सुखरुप पोहोचले असते. परंतु पुन्हा एकदा विमान रनवे २९ वर न उतरता रनवे ११ ला परवानगी मागितली. दोनदा रनवे २९ ची परवानगी मिळाली असताना रनवे ११ चा आग्रह विमानाने का केला? वास्तविक रनवे २९ ला टेबल टॉप नव्हतं. विमानाचा अँगल चुकला असता तरी विमान क्रॅश होण्याची शक्यता नव्हती.
६ आधीच विमान कमी उंचीवर आणले जाणे
रोहित पवारांनी सांगितलं की, योग्य Aiming Point येण्यासाठी ज्या योग्य अंतरावर विमानाची उंची खाली घेण्यास सुरुवात करायची होती, त्या योग्य अंतराच्या पूर्वीच विमान खाली घेण्यात आलं होतं. त्यामुळे विमान तिरकं होऊन खाली कोसळलं नसतं तरीही विमान Threshold च्या आधीच म्हणजे धावपट्टीच्या भिंतीलाच क्रॅश झालं असतं.
७ शेवटच्या काही मिनिटं पायलट एकही शब्द बोलला नसणे
अजित पवार यांच्या विमानाच्या अपघातावेळी को-पायलट शांभवी पाठक ओ शिट ओ शिट असं म्हटल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर काही सेकंदात विमान कोसळलं. परंतू मुख्य पायलट मात्र एकही शब्द बोलला नव्हता. विशेष म्हणजे अपघात होण्याच्या शेवटच्या ३-४ मिनिटात मुख्य पायलट एक शब्दही बोलला नव्हता. मृत्यू समोर असतानाही मुख्य पायलट गप्प होता, याचा अर्थ काय घ्यायचा?