Rohit Pawar Press Confernce on Ajit Pawar plane crash : रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक सवाल उपस्थित केले आहेत. अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे निधन झालं. त्यांच्या या अपघाती मृत्यूनंतर अनेक संशय व्यक्त केला जात आहे. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत विमानाच्या कंपनीवर संशय व्यक्त केला आहे. याशिवाय अजित पवारांचा विमानाचा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
अजित पवार प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी का पित होते? गेल्या काही महिन्यातील बदल...
रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत एक मोठी शंका निर्माण केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार प्लास्टिक ऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी पित होते. ऐरवी कधीही दादा प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असतं. मात्र गेल्या काही महिन्यात त्यांनी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं बंद केलं होतं. कोणत्याही सभा किंवा कार्यक्रमावेळी दादा काचेच्या बाटलीतून पाणी पिण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या सुरक्षेच्या अधिकाऱ्याच्या हातात काचेची बाटली होती. दादा प्लास्टिकच्या बाटलीवरुन काचेच्या बाटलीत का आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दादांनी रोहित पवारांना दिले होते संकेत...
रोहित पवार यावेळी म्हणाले, माझ्या मित्राने हेलिकॉप्टर घेतल्याचं मी दादांना सांगितलं होतं. त्यावेळी अजित पवारांनी तो मित्र विश्वासू असेल तर त्याच्याच हेलिकॉप्टरने प्रवास कर असं सांगितलं... बाहेरुन घेऊ नको.. आताच्या काळात बरंच काही ऐकलं आहे, असंही दादा रोहित पवारांना म्हणाले होते. महत्त्वाचं म्हणजे जवळच्या लोकांना पुढच्या काही महिन्यात विमान घ्यायला सांगितलं होतं. म्हणजे ते वापरता येईल. स्वताचं विमान असावं असा विचारदेखील ते करीत होते.
अजित दादांचा घातपात झाल्याचं सांगताना रोहित पवारांनी दिलेली महत्त्वाची कारणं...
१ दादांचा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे, पायलट बदलणे
२ केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल, ATC Transcript मधील वेळेच्या विसंगती
३ फ्लाइट रडारचा एक मिनिट आधीच बंद पडलेला डेटा
४ दृश्यमानता कमी असताना लँड करणे
५ रनवे ११ वर उतरवण्याचा आग्रह
६ आधीच विमान कमी उंचीवर आणले जाणे
७ शेवटच्या काही मिनिटं पायलट एकही शब्द बोलला नसणे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world