Dhananjay Munde : अजित पवार बीडमध्ये, आजारपणाचं कारण देत धनंजय मुंडे फॅशन शोमध्ये; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

धनंजय मुंडे हे पत्नी राजश्री मुंडेंसह मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील एका फॅशन शोमध्ये दिसले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dhananjay Munde at Mumbai fashion show : आजारपणाचं कारण देत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्यातून काढता पाय घेतलेले धनंजय मुंडे मुंबईत फॅशन शोमध्ये सहभागी झाल्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. अजित पवार 2 एप्रिल रोजी बीड दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे अनुपस्थितीत होते. प्रकृती बरी नसल्यामुळे उपचारासाठी मुंबईला यावं लागल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. मात्र त्यांना फॅशन शोमध्ये पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धनंजय मुंडे हे पत्नी राजश्री मुंडेंसह मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील एका फॅशन शोमध्ये दिसले. त्यांची मुलगी वैष्णवी मुंडे या फॅशन शोमध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी बुधवारी झालेल्या बीड दौऱ्यादरम्यान आपल्या भाषणात धनंजय मुंडेंचा उल्लेख केला. धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांचा सकाळी फोन आला होता. दुपारी रुग्णालयात अॅडमिट होतोय असंही मुंडेंनी पवारांना फोनवरुन सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात मंगळवारी रात्री उशीरा मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे एक फॅशन शोचा कार्यक्रम होता. आजारी असल्यानं अजित पवारांच्या बीड दौऱ्यात हजर राहणार नसल्याची पोस्ट त्यांनी एक्सवर टाकली होती. त्यामुळे धनंजय मुंडेंनी जाणीवपूर्वक अजित पवारांचा दौरा टाळला की अजित पवारांनीच धनंजय मुंडेंना दूर ठेवलं यांसारख्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 

Advertisement

काय केली होती पोस्ट
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी @Mahancpspeak पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती. 

Advertisement