Akola Crime: आईने 9 वर्षांच्या मुलाला बेडमध्ये कोंडलं, 20 दिवसांनी पोलिस पोहोचले, दृश्य पाहून हादरले

9  वर्षीय मुलाला लाकडी दिवाणमध्ये कोंबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली. जवळपास 20 दिवसांपासून ही महिला घराबाहेर दिसत नसल्याने संशय आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, अकोला:

Akola News: मनोरुग्ण आईने 9 वर्षांच्या मुलाला दिवाणमध्ये कोंबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यामध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. अनेक दिवसांपासून ही महिला घराबाहेर दिसत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घरात शोधले असता हा प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोल्याच्या खदान पोलिस स्टेशन हद्दीतील कौलखेड रिजनल वर्कशॉप परिसरातील साईनाथ कॉलनीत एका मनोरुग्ण मातेने आपल्या 9  वर्षीय मुलाला लाकडी दिवाणमध्ये कोंबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली. जवळपास 20 दिवसांपासून ही महिला घराबाहेर दिसत नसल्याने संशय आला.

FIR Against Uber Directors: महिला प्रवाशाचा मृत्यू, 'उबर'चे संचालक मोठ्या अडचणीत

घरातील दृश्य पाहून पोलीस हादरले

त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच खदान पोलिस, नंदादीप फाउंडेशनचे कर्मचारी निशांत सायरे व विनोद मापारी आणि स्थानिक नागरिकांनी घराची पाहणी केली. घर आतून बंद असून महिला अत्यंत मानसिक अस्वस्थ स्थितीत राहत असल्याचे आढळले.

घरातील दुर्गंधी, अस्ताव्यस्त अवस्था आणि महिलेकडून चाकूसह कॉलनीत भीतीदायक वर्तन होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली. घराच्या पाहणीत मुलगा दिवाणमध्ये कोंबलेला आढळून आला. पोलिसांनी तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवत मुलाची सुखरूप सुटका केली.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : पुणेकर पुन्हा खोळंबणार! 'या' कारणामुळे सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल 66 ठिकाणी तोडणार, 118 कोटी... )