योगेश शिरसाट, अकोला: अकोल्याच्या वाडेगावात शुल्लक कारणावरून सराईत गुन्हेगारांने दारूच्या निषेध एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात एक तरुण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अकोल्याच्या बाळापुर वेस वाडेगाव येथे घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय तुषार संतोष भटकर याने दारूच्या नशेमध्ये गावातीलच राहुल जंजाळ याच्यावर चाकूने भोकसून प्राणघातक हल्ला चढवला. यात गंभीररित्या जखमी झालेल्या राहुल ला अकोल्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवार रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. सराईत गुन्हेगार तुषार हा दारूच्या नशेत मध्ये होता, ये जा करणाऱ्यांना तो शिवीगाळ करत होता.
राहुल त्या ठिकाणहून जात असताना राहुलला शिवीगाळ केली. यानंतर तुषारने चाकू भोकसून सपासप चार वार करत राहुलला गंभीरच्या जखमी केले आणि घटनास्थळावरून पसार झाला. गंभीरच्या जखमी राहुलला नातेवाईकांनी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. याबाबतची तक्रार देण्यासाठी वाडेगाव पोलीस चौकीत गेले, चौकी बंद असल्याने बाळापुर पोलीस ठाण्यात जाऊन नातेवाईकांनी तक्रार दाखल करण्याची पोलिसांना विनंती केली. मात्र पोलिसांनी तब्बल चार तास राहुल'च्या नातेवाईकांना बसून ठेवले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रात्री तीन वाजता थेट अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठले.
(नक्की वाचा- sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनम! एकदा नाही, दोनदा नाही, तर 'इतक्या' वेळा केला होता राजाला मारण्याचा प्रयत्न)
दरम्यान, एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी योगेश शिरसाट गेल्यानंतर तेव्हा बाळापुर ठाण्याच्या पोलिसांनी राहुलची तक्रार घेतली व पुढील कारवाई सुरू केली आहे. आरोपी तुषारवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचेही राहुलच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. यात मोकाट गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
(नक्की वाचा- Sonam Raghuvanshi: सोनमनं दिला राजाचा नरबळी? राजा रघुवंशी हत्या प्रकरणात तंत्र-मंत्रचा अँगल)