यशपाल सोनकांबळे, पुणे:
Akshaya Tritiya 2026 Pune Traffic Diversion: आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अक्षय तृतीयानिमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली असून दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. आज अक्षय तृतीयेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
Samruddhi Accident: समृद्धीवर भीषण अपघात! रिल्सच्या नादात बस उलटली; चिमुकलीचा मृत्यू, 25 जखमी
पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल!
अक्षय तृतीयेचा उत्साह आणि भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त निघणारी दुचाकी फेरी यामुळे आज पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
शहरातील स. गो. बर्वे चौक ते स्वारगेटकडे जाणारी वाहतूक आता जंगली महाराज रस्त्याने वळवण्यात आली आहे. वाहनचालकांना स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक आणि टिळक चौक या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. तसेच, आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक दरम्यानचा मार्गही बंद राहणार असून, या भागातील वाहतूक बाजीराव रस्त्याकडे वळवण्यात आली आहे.
पीएमपीएमएल बस प्रवाशांनाही या बदलाचा फटका बसणार आहे. महापालिका भवनाकडे जाणाऱ्या बस आता पर्यायी मार्गाने धावतील. लाल महाल चौक ते गणेश रस्ता या दरम्यानची वाहतूकही अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. "भाविकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचा सुरळीतपणा राखण्यासाठी हे बदल केले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे," असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी केले आहे.
अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ बाप्पाला 11 हजार आंब्यांचा महाभोग
दरम्यान, अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखविण्यात आला. साडेतीन मुहूतार्पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world