Ashok Kharat : लिंगपिसाट खरातने पुरुषांनाही सोडलं नाही; ईशानेश्वराच्या मागे रिंगण आखून पुण्याच्या व्यावसायिक..

सात महिलांनी जादूटोणा आणि लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर आता पुण्यातून बाबाचं एक नवं प्रकरण समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
AI Image

प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी

Ashok Kharat Crime : भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. आधीच महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेला हा बाबा आता तब्बल 5 कोटींच्या खंडणीप्रकरणात अडचणीत आला आहे. काळी जादू, मृत्यूची भीती आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन कोट्यवधी रुपये त्याने उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या बाबाचा आणखी एक नवा प्रताप काय आहे? पाहूयात सविस्तर प्रकरण काय आहे. 

५ कोटी खंडणी उकळल्याचा आरोप

5 कोटी खंडणी.. 21 देश आणि मर्सिडीज कार... अशोक खरात स्वतःला दैवी शक्ती असलेला अंकशास्त्राचा बाप म्हणवणारा हा बाबा पोलिसांच्या नोंदीत आता गंभीर गुन्ह्यांचा आरोपी आहे. सात महिलांनी जादूटोणा आणि लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर आता बाबाचं एक नवं प्रकरण समोर आलं आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी खरातविरोधात थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर काळी जादू आणि मृत्यूची भीती दाखवत तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

Advertisement

नक्की वाचा - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, भोंदूबाबा खरातच्या लेकीच्या लग्नपत्रिकेत बड्या नेत्यांची नावं; पहिलं नाव... 

तक्रारदाराच्या म्हणण्यानूसार, व्यवसायात यश मिळवण्यासाठी तक्रारदार एका मित्राच्या मदतीने खरातकडे गेला होता. अशोक बाबाने अवतार पूजा करण्याचा त्याला सल्ला दिला होता. पूजा करण्याआधीच मृत्यूची भीती दाखवत बाबाने चक्क मर्सिडीज कार खरेदी करून घेतली. इतकंच नाही तर मिरगावमधील मंदिरात सापाचा चमत्कार दाखवत नागदेवतेचा कोप होईल असं सांगितलं. परिसाची शक्ती मिळवण्यासाठी तब्बल 21 देशांमध्ये फिरावं लागेल अशी भीती घातली. परदेश दौरे, औषधोपचार, पूजा या सगळ्याचा खर्च तक्रारदाराकडूनच करून घेतला. 

तक्रारदाराभोवती रिंगण आखून मृत्यूची भीती दाखवली...

धक्कादायक बाब म्हणजे मिरगावमधील फार्महाऊसचं बांधकाम आणि त्यातील अलिशान फर्निचरचा खर्चही जासूद यांच्याकडून जबरदस्तीने वसूल करण्यात आला. तसेच ईशानेश्वर मंदिराच्या मागे तक्रारदाराभोवती रिंगण आखून मृत्यूची भीती दाखवत त्याला अक्षरशः कैद करून ठेवलं गेल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. भीती, अंधश्रद्धा आणि मानसिक दबाव याचा वापर करून तब्बल 5 कोटींना गंडा घातल्याचा दावा करण्यात आला असून या संपूर्ण धक्क्यातून तक्रारदार अजूनही सावरलेला दिसत नाही.

विशेष म्हणजे बाबा आपल्याला फसवत असल्याचं लक्षात येताच जासूद यांनी बाबाला मर्सिडीज कार आणि पैसे परत देण्यास सांगताच बाबाने त्याला नकार देत धमकावले होते. यासोबतच आपले बिंग फुटु नये म्हणून बाबाने वावी पोलीस ठाण्यात डिसेंबर 2025 मध्ये खोटा गुन्हाही दाखल केला होता. पण आता सगळं चित्र उलटलं असून सरकारवाडा पोलिसांनी खंडणी प्रकरणातही बाबाचा तपास सुरू केला आहे. सध्या SIT आणि नाशिक पोलिसांकडून बाबाची कसून चौकशी केली जात असून भोंदू अशोकबाबाचे दिवसेंदिवस समोर येणारे कारनामे खरंच थक्क करणारे आहेत. बाबाने अजून किती जणांना आणि कशाप्रकारे आपल्या जाळ्यात अडकवले आहे ? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.