जाहिरात

Ambernath Accident: प्रचारादरम्यान मोठी दुर्घटना! शिवसेना उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

नगरसेवक पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या  महिला उमेदवार किरण चौबे या देखील जखमी झाल्या आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Ambernath Accident: प्रचारादरम्यान मोठी दुर्घटना! शिवसेना उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

Ulhasnagar News: अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून  तीन जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या  महिला उमेदवार किरण चौबे या देखील जखमी झाल्या आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथ उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. अपघातात सहभागी असलेल्या कारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

Sangram Jagtap : आमदाराला अटक होणार? संग्राम जगताप यांच्याविरोधात फौजदारी खटला; काय आहे प्रकरण?

किरण चौबे या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत बुवापाडा प्रभागातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत., प्रचार संपून घरी जात असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही दुर्घटना तेव्हा घडली, जेव्हा कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकीस्वारांना कारने जोरदार धडक दिली.

या धडकेत अंबरनाथ पालिकेचे दोन कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे, तसेच कारचालक लक्ष्मण शिंदे आणि एका पाचारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तीन जण जखमी असून किरण चौबे देखील किरकोळ जखमी झाल्या आहेत  या प्रकरणाच्या तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

( नक्की वाचा : Buldhana News : झिंगत आले अन् शाळेत धिंगाणा केला! मुख्याध्यापकाचा विद्यार्थ्यांसमोर Live ड्रामा )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com