शिंदखेडराजा: 'मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. मी विदर्भात, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईसह सगळ्या महाराष्ट्रात फिरलो. मी आजच विधानसभेचा निकाल सांगतो, 23 तारखेला आघाडीचा सुफडा साफ होणार आणि महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार बनेल... असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. सिंदखेडराजा येथे भाजप महायुतीचे उमेदवार जयकुमारभाऊ रावल यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलते होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी काँग्रेससह शरद पवार, राहुल गांधींवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले अमित शहा?
'20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होत आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. मी विदर्भात, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईसह सगळ्या महाराष्ट्रात फिरलो.23 तारखेला आघाडीचा सुफडा साफ होणार आणि महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार बनेल. काँग्रेसने हरियाणामध्येही खोटे आश्वासने दिले. तिथे काँग्रेसचा सुफडासाफ झाला. झारखंडमध्येही 80 पैकी 50 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल,' असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.
'देशातील 180 कोटी जनता नरेंद्र मोदी आणि एनडीएसोबत आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीही कमळासोबत,भाजपसोबत आहेत. महायुतीचे सरकार बनवा सर्वांच्या बँक खात्यात 2100 रुपये दर महिना जमा होतील.यावेळी महाराष्ट्रात महायुती आपल्या काळात आजपर्यंत सर्वाधिक जागा जिंकू महायुती सरकार बनवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताला महान देश बनवण्याच्या संकल्पात महाराष्ट्रही जोडला जाईल. शरद पवार, सुप्रिया सुळे, राहुल गांधी कोणीही राममंदिराच्या दर्शनाला आले नाहीत, कारण त्यांना त्यांच्या वोट बँकेची भिती वाटते. महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅनक्लब आहे तर महायुती छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांच्या सिद्धांतावर चालणारा गट आहे,' असंही अमित शहा यावेळी म्हणाले.
नक्की वाचा: लोकसभेत भाजपला 400 जागा का जिंकायच्या होत्या? शरद पवारांनी सांगितलं कारण...
काँग्रेस, शरद पवारांवर टिका...
काँग्रेस पार्टी एसटी, एससी आणि मागासवर्गियांचा विरोध करते. नरेंद्र मोदींनी एका गरिब आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवण्याचे काम केले. नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात सर्वाधिक खासदार मागासवर्गियांमधून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षांना उलेमा भेटले आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. तुम्ही मुस्लिम आरक्षणासाठी सहमत आहात का? राहुल गांधी तुम्हाला सांगतो,तुमची चौथी पिढी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही. तसेच राहुल गांधीच नव्हे, इंदिरा गांधी स्वतः स्वर्गातून आल्यातरी आता पुन्हा ३७० लागू होणार नाही, असा टोलाही अमित शहा यांनी यावेळी लगावला. तसेच २३ तारखेला कमळाच्या चिन्हावर इतक्या रागाने दाबा की इटलीला करंट गेला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी धुळेकरांना केले.