प्रांजल कुलकर्णी, नाशिक
नाशिकच्या कळवणमध्ये शरद पवारांची सभा आज पार पडली. महाविकास आघाडीतील माकपचे उमेदवार जिवा पांडू गावीत यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांना भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्ला बोल केला. 'अब की बार 400'चा नारा भाजपने का दिला होता हे देखील शरद पवार यांनी उलगडून सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार यांनी म्हटलं की, लोकसभेची निवडणूक झाली त्यात महाविकास आघाडीला तुम्ही निवडून दिले. देशभर पंतप्रधान 400 जागा निवडून द्या अशी मागणी करत होते. पन्नास टक्के जागा निवडून आल्या की सरकार स्थापन होते. याआधी संख्या कमी असतानाही काही सरकार टिकले. पण भाजपला 400 जागा कशासाठी हव्या होत्या? असा प्रश्न पडला होता. त्यावेळी आम्ही खोलात गेलो, मग कळले संविधान बदलायचे आहे. त्यासाठी 400 पेक्षा अधिक खासदारांची मागणी करत होते, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
(नक्की वाचा- VIDEO : नागपुरात 'मोहब्बत की दुकान', काँग्रेस उमेदवार प्रचारादरम्यान थेट भाजप कार्यालयात)
त्यानंतर आम्ही विरोधी पक्षांना एकत्र केलं आणि आघाडी स्थापन करत त्याला इंडिया आघाडी नाव दिलं. काँग्रेस, आम्ही, माकप आणि शिवसेनेचे लोक त्यात होते. देशातील लोकांना सांगितलं की 400 जागा दिल्या तर संविधानाला धक्का लागेल. मला आनंद आहे, सगळ्यांनी धोका ओळखला आणि आकडा ओलांडू दिला नाही. चंद्रा बाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी त्यांना साथ दिली म्हणून सरकार आले, पण ते घटनेला धक्का लावू शकत नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- अमित ठाकरेंची विकासाची 'ब्लू प्रिंट'! आमदार झाल्यास माहीमकरांसाठी कोणकोणती कामे करणार?)
लाडकी बहीण योजनेला विरोध नाही
महायुती सरकारने महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना आली, आमचा त्याला विरोध नाही. मात्र मदत करा पण संरक्षण करण्याची जबाबदारी टाळता येणार नाही. काही महिन्यांपूर्वी शाळेत मुली सुरक्षित नाही हे आपण पाहिलं. 680 पेक्षा अधिक मुली कुठं गेल्या याचा पत्ता लागत नाही. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना सुरक्षा देता येत नाही. आम्ही मुलींच्या संरक्षणाच्या बाबतीत काळजी घेणार आहोत, आर्थिक मदत सुद्धा करणार आहोत. एसटीचे तिकीट काढायची गरज नाही, मोफत प्रवास देणार आहोत, असं आश्वासनही शरद पवारांना यावेळी दिलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world