अमोल मिटकरींची कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा धक्कादायक मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारची आज (मंगळवार, 30 जुलै) तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड प्रकरणातील आरोपी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

शुभम बायास्कार, प्रतिनिधी

Amol Mitkari Car smashed : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारची आज (मंगळवार, 30 जुलै) तोडफोड करण्यात आली होती. मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली होती. तोडफोड प्रकरणातील आरोपी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. ते 28 वर्षांचे होते.

अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार सहभागी होते. या विश्रामगृहात झालेल्या राड्यानंतर मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या झटापटीनंतर जय मालोकर यांच्या छातीमध्ये दुखत होत असल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर मनसे राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता. यावरुनच मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची कार फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मिटकरी यांची कार फोडली. अकोल्यातील विश्रामगृहाच्या बाहेर हा प्रकार घडला. मालोकर या हल्ल्यात सहभागी होते. 

( नक्की वाचा :  BJP vs NCP वाद चिघळला! अमोल मिटकरींनी केली भाजपाच्या बड्या मंत्र्यांची तक्रार )

या प्रकरणात मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. जय मालोकरही त्यामध्ये आरोपी होते. 

Topics mentioned in this article