Amravati News: 'गिनीज बुक' रेकॉर्डच्या नावाखाली कलाकारांची फसवणूक, 12 लाख उकळल्याचा आरोप

नागपूरच्या मनीष पाटील फाउंडेशनकडून या कलाकारांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या कलाकारांनी आता गाडेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचे आमिष दाखवून अमरावती जिल्ह्यातील संगीत कलाकारांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या एका फाऊंडेशनने या कलाकारांकडून तब्बल 12 लाख उकळले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागपूरच्या मनीष पाटील फाउंडेशनकडून या कलाकारांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या कलाकारांनी आता गाडेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

(नक्की वाचा-  Nagpur Vande bharat: नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा 10 ऑगस्टला शुभारंभ; ट्रेनचा मार्ग, तिकीट दर किती?)

नेमका प्रकार काय?

हा प्रकार जानेवारी महिन्यामध्ये अमरावतीमध्ये घडला होता. त्यावेळी अमरावतीमध्ये सलग 18 दिवस गीत गायन, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून देतो, असे आश्वासन मनीष पाटील याने कलाकारांना दिले होते. यासाठी त्याने कलाकारांकडून12 लाख रुपये घेतले.

(नक्की वाचा- फेसबुकवर भेटल्या चारचौघी, आजोबांची रिकामी झाली तिजोरी; 9 कोटी गमावल्याने जडला स्मृतीभ्रंश)

मात्र, या घटनेला तब्बल 7 महिने उलटूनही गिनीज बुकमध्ये कोणतीही नोंद झाली नाही, तेव्हा फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. यानंतर अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाच्या वतीने फसवणुकीची तक्रार गाडेनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे, तक्रार दाखल करूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या गंभीर प्रकारामुळे अमरावतीतील कलाकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article