जाहिरात

Amravati Scam: सुट्टीच्या दिवशीही शाळेत खिचडी शिजली, अमरावतीत खिचडीचा महाघोटाळा उघडकीस

चक्क शाळेला सुट्टी असलेल्या दिवशी खिचडी शिजवल्याची बिल सादर करून पैसे लाटल्याचं समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Amravati Scam: सुट्टीच्या दिवशीही शाळेत खिचडी शिजली, अमरावतीत खिचडीचा महाघोटाळा उघडकीस

शुभम बायस्कार, अमरावती: शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी मध्यान भोजन योजना राबवली जाते.  या आधी या योजनेत अनेकदा घोटाळे झाल्याचे उघड झाले आहे. मात्र अमरावतीत एक वेगळाच घोटाळा उघड झाला आहे. चक्क शाळेला सुट्टी असलेल्या दिवशी खिचडी शिजवल्याची बिल सादर करून पैसे लाटल्याचं समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती महानगरपालिकेच्या एकूण 63 शाळा असून तीनशे खाजगी शाळा आहेत.  14 एप्रिल या सुट्टीच्या दिवशी महापालिकेच्या पाच आणि खाजगी तीन शाळांमध्ये मध्यान भोजन शिजवल्याचे उघड झालं. या पाच शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. तसेच या सुट्टीच्या दिवशी ग्रामीण भागात आणि इतर जिल्ह्यांमध्ये खिचडीची बिल सादर केल्याचे समोर आले आहे. 

 अमरावती महानगरपालिकेच्या आठ शाळांमध्ये हा नियमबाह्य प्रकार झाल्याच समोर आलाय. राज्याच्या शिक्षण संचालकांनीही पोर्टलवर सुट्टीच्या दिवशी शाळांनी उपस्थितीची नोंद केल्याबाबत ताशेरे ओढलेले आहेत.

 नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video )

सुट्टीच्या दिवशी खिचडीचा घोटाळा कुठे कुठे झाला?

महापालिका मराठी शाळा बेनोडा

महापालिका उर्दू गर्ल्स स्कूल नंबर 3 जुनी वस्ती बडनेरा 

 असोसिएशन उर्दू हायस्कूल बडनेरा

 महापालिका मराठी शाळा अकोली

संत गाडगेबाबा प्रायमरी स्कूल शिवाजीनगर 

महापालिका प्रायमरी मराठी स्कूल नंबर 20 नवाथे नगर

असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल चांदणी चौक अमरावती

महापालिका उर्दू प्रायमरी स्कूल नंबर 5 फ्रेजरपुरा अमरावती

नक्की वाचा - Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं

दरम्यान, राज्यात या आधी देखील मध्यान भोजनामध्ये घोटाळा झाल्याच उघड झाले आहे. त्यात अनेक अधिकाऱ्यांना तसंच शिक्षकांना जेलमध्ये जाण्याची वेळ सुद्धा आली होती. त्यातच आता अमरावतीमध्ये सुट्टीच्या दिवशी शाळांमध्ये खिचडी शिजवल्याचं दाखवून पैसे लाटल्याच समोर आलय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com