शुभम बायास्कर, अमरावती:
Amravati News: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गर्भपातानंतर दोन दिवसातच या महिलेवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मात्र शस्त्रक्रियेवर तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त महिलेच्या पतीने डॉक्टरांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) व जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा व चुकीच्या उपचारामुळे अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील पल्लवी गुडधे यां महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पती भूषण गुडधे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ZP Election 2026 : एकाच घरात पाच जणांना उमेदवारी, त्यात पक्षही तीन; परभणीत राजकारण की फॅमिली ड्रामा?
१२ सप्टेंबर ला कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी पल्लवी गुडधे यांना जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तपासणीत त्या गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयातच त्या महिलेचा गर्भपात करण्यात आला, त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच डॉक्टरांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, मात्र गर्भपात झाल्यानंतर काही दिवस त्या महिलेला आरामाची गरज असताना देखील,अवघ्या दोन दिवसात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर गमावला जीव
शस्त्रक्रियेच्यावेळी तिला भूल देण्याचे anaesthesia इंजेक्शन दिले होते. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती गंभीर झाल्याने ती महिला कोमात गेल्याचे सांगून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय देखील प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने पल्लवीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.एमआरआय व सिटी स्कॅन अहवालात मेंदूला सूज व मेंदू डॅमेज झाल्याचे निदर्शनास आले.
ऑक्सिजनचा पुरवठा योग्य न झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप कुटुंबियांनि केला आहे. उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत असलेल्या पल्लवी गुडधे यांचा मृत्यू झाला.या प्रकरणात जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथील दोषी असलेल्या डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.