आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक गाजवलेले जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी सभा घेतल्या. त्यांच्या आणि रोड शोला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देशमुखांचा गड मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढत असलेल्या अर्चना चाकूरकर यांच्या प्रचारार्थही त्यांनी सभा घेतली.
म्हणजे एकीकडे अमित देशमुखांसाठी रितेश देशमुख प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे पवन कल्याण यांनीही दण्यात एन्ट्री घेतली आहे. अशात बॉलिवूड स्टार की साऊथ सुपरस्टार? कोण बाजी मारणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
पवन कल्याण यांना शनिवारी दिवसभरात अनेक महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. प्रत्येक सभेत त्यांना मराठीतून बोलण्यास सुरुवात करत उपस्थितांचं मन जिंकलं. तसेच मराठी भाषेचा मी सन्मान करतो, त्यामुळे काही चुकलं तर माफी असावी, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. प्रत्येक भाषणात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज याचा गौरव केला. तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.
(नक्की वाचा- फडणवीस, गिरीश महाजन, बावनकुळे, विखे पाटील यांसारखे बडे नेते अडचणीत; रोहित पवारांचा मोठा दावा)
पवन कल्याण यांनी म्हटलं की, मी इथे फक्त मते मागण्यासाठी आलो नाही. ज्या भूमीत अनेक महापुरुषांचा जन्म झाला, ज्या भूमीत अनेक संत जन्मले, ज्या भूमीत महान लोक होऊन गेले त्या भूमीला मी आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी.. ज्या मातीने आपल्या हक्कासाठी लढायला शिकवले त्या मातीचा आदर करायला आलो आहे. ज्या मातीने स्वराज्य शब्दाला अर्थ दिला त्या मातीचा आदर व्यक्त करायला आलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे.
मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. बोलता बोलता चूक झाली असेल तर माफ करा. बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. अन्यायाला विरोध करण्यासाठी ते माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी मला निर्भयपणे सनातन धर्माचे रक्षण करण्याची प्रेरणा दिली. जनसेनेच्या सात तत्त्वांपैकी एक तत्त्व बाळासाहेबांनी प्रेरित केलेले आहे. प्रादेशिकतेकडे दुर्लक्ष न करता राष्ट्रवाद. सत्तेची पर्वा न करता स्वतःच्या तत्वांवर ठाम राहायचे असते हे मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो, असंही पवन कल्याणने सांगितलं.
कलम 370 ते पीएम किसान योजना
पवन कल्याण यावेळी महायुती आणि मोदी सरकारच्या कामांचा पाढाही वाचला. देशातील गेल्या दहा वर्षांच्या एनडीएच्या राजवटीवर नजर टाकली तर कलम 370 हटवल्यानंतरचं काश्मीर दिसेल. अयोध्या राम मंदिराने सजलेली दिसते. एनडीएच्या राजवटीत देशाला जोडणारे रस्ते दिसू लागले आहेत. गावोगावी रस्ते पसरलेले दिसतात. गेल्या दहा वर्षांत एनडीए सरकारने 25 कोटी भारतीयांना गरिबीतून बाहेर काढले आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला आहे. पीएम किसानच्या माध्यमातून 12 कोटी लोकांना फायदा झाला आहे. मुद्रा योजनेने 30 कोटी मुलींना मदत केली आहे, अशी लिस्टची पवन कल्याण यांनी वाचून दाखवली.
(नक्की वाचा- प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO)
देश वाचवण्याचा निर्णय तुमच्या हातात
महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर सनातन धर्माच्या रक्षणासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसच्या राजवटीत पालघरमध्ये संतांची त्यांची हत्या झाली. अशा प्रकारची सरकारे आपल्याला नको आहेत. संतांचे आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे सरकार हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची हिमालयाप्रमाणे दक्षिण भारताचे रक्षण केले. अनेक आक्रमकांना येण्यापासून रोखले. त्यामुळे दक्षिणेकडील देशात मंदिरे पाडता आली नाहीत. आम्ही देखील कठोर परिश्रमाने देश मिळवला आहे. आता देश वाचवण्याचा निर्णय तुमच्या हातात आहे, असं पवन कल्याण यांनी म्हटलं.